Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुढची 10वर्षे शनीची 'या ' राशींवर राहील वक्रदृष्टी, जीवनात वाढणार अडचणी

पुढची 10 वर्षे शनीची 'या ' राशींवर राहील वक्रदृष्टी, जीवनात वाढणार अडचणी 


ज्योतिषशास्त्रात, नवग्रहांना विशेष महत्त्व आहे. यात शनी हा खूप प्रभावी ग्रह आहे. शनी कोणत्याही राशीत अडीच वर्षे राहतो आणि त्यानंतर राशी परिवर्तन करतो. त्यामुळे शनीला राशीचक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतात. सध्या शनी कुंभ राशीत भ्रमण करत असून 2025 मध्ये मीन राशीत प्रवेश करेल. शनिचे हे संक्रमण होताच सर्व राशींवर त्याचा प्रभाव दिसेल. 
त्यानुसार, शनिचा मीन राशीत प्रवेश होताच मेष राशीच्या लोकांसाठी साडेसतीचा पहिला टप्पा, मीन राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी तिसरा टप्पा सुरू होईल. शनिचे प्रत्येक संक्रमण काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ ठरते. त्यानुसार जाणून घेऊया शनिच्या वक्रीदृष्टीचा कोणत्या राशींना पुढील 10 वर्षे त्रास होईल. 

या राशींवर राहणार शनिची साडेसाती
पंचांगानुसार, 29 मार्च 2025 रोजी शनी मीन राशीत प्रवेश करेल, त्यामुळे मेष राशीच्या लोकांना शनिची साडेसाती सुरू होईल. याशिवाय कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी देखील साडेसातीचा त्रास राहील. कुंभ राशीच्या लोकांवर 03 जून 2027 पर्यंत शनिच्या साडेसातीचा प्रभाव राहील. त्यामुळे मेष राशीचे लोक 2032 पर्यंत साडेसातीच्या अधीन राहतील. सन 2027 मध्ये वृषभ राशीच्या लोकांना शनिची साडेसाती सुरू होईल, तर 08 ऑगस्ट 2029 पासून मिथुन राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव सुरू होईल. मे 2032 पासून कर्क राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव सुरू होईल. त्यानुसार, 2024 ते 2034 पर्यंत शनिची दृष्टी कुंभ, मीन, मेष, मिथुन आणि कर्क राशीवर असेल. कारण या राशींवर साडेसतीचा प्रभाव असेल.
या राशींना मिळेल दिलासा

2025 मध्ये काही राशींची साडेसाती सुटणार आहे. त्यानुसार 29 मार्च 2025 रोजी मकर राशीच्या लोकांना शनिच्या साडेसतीपासून सुटका मिळेल. तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनिच्या महादशेतून मुक्तता मिळेल.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. सांगली दर्पण या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.