भारतीय टपाल विभागात काम करू पाहणारे अनेक जण दरवर्षी ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत असतात त्या प्रतिक्षेला आता विराम मिळणार कारण भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवकांच्या भरतीचा अर्ज जारी केला आहे. १५ जुलै पासून भरती सुरु होणार असून ३० हजार पेक्षा अधिक जणांना ग्रामीण डाक सेवकांच्या पदी नियुक्त केलं जाणार आहे. ज्या कुणाला टपाल विभागात काम करण्याची इच्छा आहे वा कोणी नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी हि सुवर्णसंधी चालून आली आहे.
सहाय्यक महासंचालक (GDS/PCC/PAP) रवी पाहवा यांच्या कार्यालयाने मुख्य पोस्टमास्टर जनरल आणि महाव्यवस्थापक, CEPT बेंगळुरू/हैदराबाद युनिट यांना सूचना जारी केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की GDS ऑनलाइन एंगेजमेंट, शेड्यूल 2024 अंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात भरती अधिसूचना जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे सांगण्यात आले आहे की ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरतीसाठी 15 जुलै रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे.
इतर कामांप्रमाणे इच्छुक उमेदवारांना जास्त अटींचा सामना करावा लागणार नाही आहे. उमेदवाराची गणित आणि इंग्रजी विषयांसहित मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पूर्ण असावी. तसेच उमेदवाराचे वय हे १८ ते ४० वर्षाच्या मध्ये असावे. पदांसाठी निवड पूर्णपणे १०वीच्या मेरिटच्या आधारे होणार असल्याने उमेदवाराची कोणतीही लिखित परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही आहे. मेरिट लिस्ट मध्ये नाव आल्यावर फक्त कागदपत्रांच्या पुष्टीसाठी बोलावलं जाईल. जुलैच्या १५ तारखेपासून इच्छुक उमेदवाराला भरतीसाठी अर्ज करता येणार असून अर्ज खालील वेबसाइटवर भरता येणार आहे.
निवड झालेल्या ग्रामीण डाक सेवकाला भत्ता स्वरूपात कार्यालय देखभाल भत्ता, निश्चित स्टेशनरी भत्ता, नाव भत्ता, रोख वाहन भत्ता, वेळ-संबंधित सातत्य भत्ता (TRCA), महागाई भत्ता (DA) तसेच वैद्यकीय भत्ता देण्यात येईल. ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवकपदी निवड करण्यात येणाऱ्या उमेदवाराची दर माह देय रक्कम पूर्णपणे त्या व्यक्तीच्या लेव्हल तसेच मेरीटवर अवलंबून असेल. तरी सुरवाती रक्कम १०,००० ते १५,००० असण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.