Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी आमदाराला अश्लील Video व्हायरल करण्याची धमकी देत तब्ब्ल 1 कोटची खंडणी

माजी आमदाराला अश्लील Video व्हायरल करण्याची धमकी देत तब्ब्ल 1 कोटींची खंडणी 


अहमदनगर जिल्ह्यातून ब्लॅकमेलिंग संदर्भात एक मोठे वृत्त आले आहे. एका माजी आमदाराला तथाकथित पत्रकाराने तब्बल एक कोटी २५ हजारांची मागणी करत ब्लॅकमेलिंग केल्याचे समोर आले आहे. आमच्याकडे अश्लील व्हिडीओ असून ते व्हायरल करायचे नसतील तर एक कोटी २५ हजार रुपये लागतील असे या पत्रकाराने म्हटले होते. या प्रकरणी नगरमधील एका पत्रकारासह २ महिलांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इस्माईल दुराणी उर्फ भैय्या बॉक्सर, कल्पना सुधीर गायकवाड व बांगर नावाची एक महिला असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. यातील भैय्या बॉक्सर व एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोद्याचे माजी आमदार यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी भैय्या बॉक्सर हा नगरमध्ये एक ऑनलाईन न्यूज पोर्टल चालवत पत्रकार म्हणून मिरवत असे, तो व या २ महिला असे तिघे जण गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदारास फोन करून पैशांची मागणी करत होत्या.

‘तुमची अश्लिल व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे, ती सोशल मिडियावर व्हायरल करुन तुमची बदनामी करु, तुमच्याविरुद्ध पोलिसांना अत्याचाराचा गुन्हा दाखल करायला भाग पाडू आणि तुमचं राजकीय अस्तित्व पूर्णतः संपवून टाकू,’ अशी धमकी देत ब्लॅकमेल केले.
यातील भैय्या बॉक्सर याने माजी आमदार यांचे स्वीय सहाय्यक शेख यांच्याकडून २५ हजार रुपये घेतले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. वारंवार होणाऱ्या या ब्लॅकमेलिंगला कंटाळून माजी आमदारांनी नगरमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर शुक्रवारी (दि.२८) रात्री उशिरा फिर्याद देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या तिघांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३८४, ३८५, ३८८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांवर देखील शाब्दिक बाण
गुन्हा दाखल होताच पोलिसांचे पथक भैय्या बॉक्सरच्या घरी त्याला अटक करण्यासाठी गेले. त्यावेळी मी पत्रकार आहे. तुम्ही मला अशी अटक करू शकत नाही, माझी वरपर्यंत पोहोच आहे. विधानसभेत आणि संसदेत हा विषय उपस्थित करायला लावून तुमच्या नोकऱ्या घालविन अशा प्रकारे पोलिस पथकाला त्याने धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याच्या आरडाओरड्याकडे दुर्लक्ष करत त्याला पकडून पोलिस ठाण्यात आणले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.