जगात वेगवेगळे देश आहेत आणि प्रत्येक देशाचं एक वेगळेपण आहे. कुठे गरीबी आहे तर कुठे श्रीमंत. कुठे शांतता तर कुठे वर्दळ आहे. पण काही ठिकाणं हे सामान्य ठिकाणांपेक्षा वेगळी आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका वेगळ्या बेटाबाबत सांगणार आहोत. इथे लोक शांतपणे झोपूही शकत नाहीत. महत्वाची बाब म्हणजे या येथील लोकांच्या घरात टीव्ही आणि लाईट सुरू असतात.
सामान्यपणे झोपताना लोक लाईट बंद करतात. पण जगात एक असंही ठिकाण आहे जिथे लोक टीव्ही आणि लाईट सुरू करूनच झोपतात. या बेटाचं नाव आहे येऑन्गपेयॉन्ग. हे एक छोटं बेट आहे. त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियामधील या बेटावरील लोकांचं जीवन अजिबात शांत आणि समाधानी नाही. येथील लोकांना नेहमीच सतर्क रहावं लागतं. हे बेट दक्षिण कोरियाचा दुश्मन देश उत्तर कोरियापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे. यावर्षी जानेवारीमध्ये उत्तर कोरियाकडून इथे फायरिंग करण्यात आली होती. त्यामुळे लोक नेहमीच सतर्क राहतात. येथील लोकांनी बॉम्ब हल्ल्यापासून वाचण्यासाठी बॉम्ब शेल्टर्समध्ये शरण घेतली. जुंग युन जिन नावाच्या महिलेने सांगिलं की, टीव्ही आणि लाईट सुरू असल्याशिवाय येथील लोक झोपतही नाहीत. इथे सतत हल्ला होण्याची भिती असते.२०१० मध्ये झालेल्या हल्ल्यात येथील दोन लोकांचा मृत्यूही झाला होता. अशात इथे अनेक बॉम्ब शेल्टर्स बनवण्यात आले आहेत. येथील बंकरमध्ये आठवडाभर पुरेल इतकं जेवण, औषधी आणि गॅस मास्कसारख्या वस्तू असतात. टीव्ही आहेत. येथील लोकांना सतत भिती असते की, नॉर्थ कोरिया कधीही हल्ला करून हे बेट उद्ध्वस्त करू शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.