Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ममता बॅनर्जीचं मोठं विधान! भाजपाला PM पदासाठी सुचवला चेहरा :, कोण आहे 'तो ' नेता?

ममता बॅनर्जीचं मोठं विधान! भाजपाला PM पदासाठी सुचवला चेहरा :, कोण आहे 'तो ' नेता?


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक निकाल येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तातडीनं राजीनामा देण्याची मागणी केली आहे. आरएसएसमध्येही चांगली लोक आहेत. जर तुम्ही आवाज उचलला नाही तर लोकशाही टिकणार नाही. त्यासाठी अटल बिहारी वाजपेयींच्या कॅबिनेटमधील एक नवीन पंतप्रधान व्हायला हवा असं मोठं विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, नरेंद्र मोदी यांनी नैतिकतेच्या आधारे तातडीने राजीनामा दिला पाहिजे आणि अटल वाजपेयींच्या कॅबिनेटमध्ये असणाऱ्या व्यक्तीला पंतप्रधान बनवायला हवं. पंतप्रधान मोदी ४०० पारची घोषणा देत होते. परंतु भाजपाला स्वबळावरही बहुमत मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. इंडिया आघाडीला संधी मिळायला हवी असंही त्यांनी म्हटलं. 

कोण आहे 'तो' नेता?
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळात ममता बॅनर्जी या एनडीएच्या घटक पक्ष होत्या. त्यासोबत वाजपेयींच्या मंत्रिमंडळात त्या मंत्री होत्या. अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्‍यांमध्ये खूप चांगले संबंध होते. स्वत: अटलबिहारी वाजपेयी कोलकाता येथील कालीघाटच्या ममता बॅनर्जींच्या घरी गेले होते. ममता बॅनर्जी या सुरुवातीपासून वाजपेयींचं कौतुक करतात. मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतरही ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत अटल बिहारी वाजपेयी यांचं कौतुक केले. 

त्याचसोबत आता मोदींनी जावं आणि इंडिया आघाडी यावी असं स्पष्ट ममता बॅनर्जी यांनी म्हटलं. देशातील घटक पक्षांनी देश आणि संविधानाच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीसोबत यावं असं आवाहनही ममता यांनी केले. निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांच्यासह अनेक नेत्यांसोबत ममता बॅनर्जी यांनी चर्चा करत अभिनंदन केले. 
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचा जलवा

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा असून याठिकाणी ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीशी फारकत घेत स्वबळावर निवडणूक लढली होती. त्याठिकाणी २९ जागांवर ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीनं आघाडी घेतली तर १२ जागांवर भाजपा पुढे आहे. तर काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.