पुणे :- पुण्याचे माजी महापौर असलेले खासदार आणि केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार मंत्री मुरलीधर मोहोळl यांनी fc रस्त्यावरील हॉटेलमध्ये ड्रग्जचा व्यापार होत असल्याच्या बातमीची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोनवर संपर्क साधला आणि पुण्याची बदनामी होऊ देणार नाही , तात्काळ त्या संबधित हद्दीतील पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकासह जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबित करून कडक कारवाई करा असे निर्देश दिले आहेत .
काय म्हणालेत मुरलीधर मोहोळ….
काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असतानाचे व्हिडिओ वृत्तवाहिन्यांमधून पुढे आली असून हा प्रकार अत्यंत गंभीर बाब आहे. या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्याशी बोलणे झाले असून ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्याच्या निरिक्षकांना आणि जबाबदार घटकांना तातडीने निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय संबंधित हॉटेलचे चालक-मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. सदरील प्रकार आणि त्यामुळे आपल्या पुण्याची होणारी बदनामी कधीही सहन केली जाणार नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.