नीट परीक्षेत पेपरफुटी व निकालातील वाढीव गुण प्रकरणी दाखल याचिकेवर आज (दि. ११जून) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला नोटीस बजावली आहे. तसेच पुढील सुनावणी ८ जुलै राेजी हाेईल. ताेपर्यंत 'एनटीए'ने उत्तर दाखल करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
समुपदेशन प्रक्रियेला स्थगितीस नकार
आजच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, परीक्षेच्या पावित्र्याला धक्का बसला आहे, त्यामुळे एनटीएकडून उत्तर हवे आहे. तसेच समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होईल. तोपर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आपले उत्तर दाखल करेल, असेही आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
नीट परीक्षा घोळाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक समितीही स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली हाेती. याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाल्या आहेत.नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर, Physics Wallahचे सीईओ अलख पांडे यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले की, आज सर्वोच्च न्यायालयात निकालापूर्वी सूचीबद्ध केलेल्या प्रकरणाची सुनावणी होती; पण ग्रेस मार्क्स व अन्य गोष्टींबाबत आमची याचिका उद्या लिस्ट केली जाईल. आज सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, नीट परीक्षेचे पावित्र्य धोक्यात आले आहे. याचा अर्थ कुठेतरी त्यांना असेही वाटते की परीक्षेत काही समस्या आहेत. 'एनटीए'ला 8 जुलैपूर्वी याचे उत्तर देण्यास सांगितले परंतु त्यांनी यावर कोणताही दिलासा दिलेला नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.