NEET Paper Leak :-नितीश कुमारच्या घरी रंगला पेपरफुटीचा खेळ :बिहारच्या विध्यार्थीनें सांगितले ' त्या ' रात्री कसा रंगला खेळ
बिहारमधील समस्तीपूरच्या 22 वर्षीय अनुराग यादवने पोलिसांसमोर कबूल केले की, त्याला नीट परीक्षेचे फुटलेले पेपर त्याच्या ज्युनिअर इंजीनिअर असलेल्या मामांकडून मिळाले होते. याने पोलिसांना सांगितले की, "मी कोटाहून परत आल्यानंतर 4 मे 2024 रोजी मला माझ्या काकांनी नितीश कुमार आणि अमित आनंद यांच्या घरी नेले.
तेव्हा मला तेथे नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका देण्यात आली. त्यानंतर मला रात्रभर प्रश्नांची उत्तरे पाठ करायला लावली." आरोपी अनुराग यादवचा मामा सिकंदर प्रसाद यादव बिहारच्या दानापूर नगरपरिषदेत जेई म्हणून कार्यरत आहे. चौकशीत त्याने अनेक मोठे खुलासे केले आहेत.
सिकंदर म्हणाला, त्याने NEET चे चार उमेदवार आयुष राज, शिवानंदन कुमार, अभिषेक कुमार आणि अनुराग यादव यांना पाटण्यात राहण्यास मदत केली होती. अनुराग त्याचा भाचा होता. तो आपली आई रीना कुमारीसोबत पाटण्याला आला होता. यादव पुढे म्हणाला की, तो एका रॅकेटच्या संपर्कात होता, ज्याने केवळ NEET च्याच नाही तर BPSC आणि UPSC सारख्या कठीण परीक्षांच्या प्रश्नपत्रिकाही लीक केल्या होत्या.आरोपी विद्यार्थी अनुरागने आपल्या कबुलीजबाबात म्हटले की, "दुसऱ्या दिवशी मी परीक्षा देण्यासाठी केंद्रावर पोहोचलो तेव्हा प्रश्न पाहून थक्क झालो. प्रश्न पत्रिकेत सर्व प्रश्न तेच होते ज्याचा मी रात्री अभ्यास केला होता." अनुरागच्या कबुलीनंतर बिहारमध्ये पेपरफुटी झाल्याचे स्पष्ट झाले. NEET पेपर लीक प्रकरणी कनिष्ठ अभियंता सिकंदर प्रसाद यादवंदू यालाही पोलिसांनी अटक केली आहे. गेस्ट हाऊसच्या एंट्री रजिस्टरमध्ये ज्याच्या नावाची नोंद आहे, तोच अनुराग यादव आहे.उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी यापूर्वीच सिकंदर प्रसाद यादव तेजस्वी प्रसाद यादव यांचे स्वीय सचिव प्रीतम यांच्या जवळचे असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी पेपर लीक प्रकरणातील आरोपींचे राजदच्या तीन प्रमुख लोकांशी संबंध असल्याचा दावा केला आहे. NEET-UG 2024 पेपर फुटल्याच्या आरोपांवरून आणि 1,500 हून अधिक उमेदवारांना ग्रेस मार्क्स दिल्याच्या आरोपांवरून गेल्या आठवड्यात देशभरात विद्यार्थ्यांच्या निदर्शने झाली होती.
दरम्यान पेपर फुटीप्रकरणी आता बिहारमधून अटक करण्यात आलेल्या चार जणांमध्ये उमेदावर अनुराग यादव, दानापूर नगरपरिषदेतील कनिष्ठ अभियंता सिकंदर यादवंदू आणि इतर दोन आरोपी नितीश कुमार व अमित आनंद यांचा समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.