Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

''IAS लोकांनी स्वतःला सर्वज्ञानी...' गडकरीनी सर्वासमोर अधिकाऱ्यांना झापलं

'IAS लोकांनी स्वतःला सर्वज्ञानी...' गडकरीनी सर्वासमोर अधिकाऱ्यांना झापलं 


नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. प्रसंगी ते आपल्याच पक्षातील नेत्यांनाही बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. प्रशासकीय अधिकारीही त्यांना बिचकून असतात. अशीच एक घटना नागपूरमध्ये पाहायला मिळाली. नितीन गडकरी यांनी नागपूर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कान उपटले. IAS अधिकारी स्वतःला सगळ्या विषयाचे ज्ञानी समजून सरकार स्वतः चालवत असल्याचा आव आणत असल्याची खरपूस टीका गडकरी यांनी केली. या घटनेची चर्चा आता शहरात होत आहे. गडकरी आज नागपूर दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांना पालिकेला भेट दिली.

गडकरींना महापालिका अधिकाऱ्यांना झापलं

हाफिज काँट्रॅक्टरला नागपूर महानगर पालिकेचा आर्किटेक्ट बनवून त्याला सांगितलं. इतक्या नालायक माणसांसोबत काम करण्याचं तुला प्रशिक्षण दिलं. मुर्दाड सिस्टमसोबत काम करण्याचं प्रशिक्षण तुला मिळालंय. तू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन यशस्वी काम करू शकतो. आपली स्पर्धा चायनासोबत आहे. चायना आपाल्यापेक्षा 15 वर्ष पुढे आहे. आपल्याला पुढील पाच वर्षात चायनासोबत स्पर्धा करणे शक्य आहे, हे कठीण नाही. जपानला मागे टाकून आता ऑटोमोबाईल क्षेत्रात भारत जगात तिसऱ्या नंबरवर आहे. लवकरच पहिल्या क्रमांकावर जाणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

अधिकाऱ्यांचे उपटले कान
मामुली लायसन्स घेण्यासाठी पण अनेक अडचणींनाचा सामना करावा लागतो, मला त्यावर बोलायचं नाही. सरकारी कर्मचारी परवानगी मिळविण्यासाठी वर्ष घालवतात. त्याचा परिणाम प्रकल्प किंमत वाढण्यावर होतो, ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिले त्यालाच इतर परवानगी आणायला संगण्याचे आदेश मी संचालकांना दिले. ते म्हणाले कसं शक्य आहे, तो चहा पाणी पाजेल, रात्री जेवण भोजन चारून 15 दिवसात परवानगी आणेल काही गोष्टी मनाला पटतात काही पटत नाही. आमचे IAS अधिकाऱ्यांना मी मजाकीत म्हणतो तुम्ही सगळ्याच विषयाचे ज्ञानी आहेत, आम्ही मंत्री लोकांना काय समजता आम्ही अंगुठेछाप आहोत? तुम्ही IAS अधिकारी असल्याने तुम्ही सरकार चालविण्याचा ठेका घेतला आहे का? कोणी एक विषयात तज्ञ असू शकतो, पण 10 विषयांचा नसू शकतो, असं म्हणत नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.