डीवायएसपी रंगले हॉटेलच्या रुममध्ये महिला पोलीसासोबत पकडलं, DSP ला थेट बनवल शिपाई, कोण आहे हा अधिकारी?
उत्तर प्रदेश पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्याला पदोन्नतीऐवजी पदावनती केली आहे. या पोलीस अधिकाऱ्याला उपअधीक्षक पदावरून पदावनत करून गोरखपूरमधील 26 व्या प्रांतीय सशस्त्र कॉन्स्टेब्युलरी (PAC) बटालियनमध्ये हवालदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील कानपूर आणि उन्नावशी संबंधित आहे. तीन वर्षांपूर्वी कृपा शंकर कन्नौजिया यांची उन्नावमध्ये मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच दरम्यान त्याचे एका महिलेशी प्रेमसंबंध निर्माण झाले. 6 जुलै 2021 रोजी मंडळ अधिकारी कृपा शंकर कन्नौजिया यांनी कौटुंबिक कारणास्तव उन्नाव पोलीस अधीक्षक (एसपी) यांच्याकडे रजा मागितली होती. एसपींनीही त्यांची रजा मंजूर केली. कृपा शंकर कन्नौजिया सुटी घेऊन कामावर निघाले, पण घरी पोहोचले नाहीत, असे सांगण्यात येत आहे. घरी जाण्याऐवजी ते कानपूरमधील हॉटेलमध्ये थांबले. त्याचा फोनही बंद होता.
पत्नीने घेतली पोलीसात धाव
कन्नौजिया घरी न पोहोचल्याने त्यांच्या पत्नीला काळजी वाटू लागली. ते पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यांनी उन्नावच्या पोलीस अधीक्षकांना कन्नौजिया बेपत्ता झाल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेणे सुरु केले. उन्नाव पोलिसांनी सीओ कन्नौजिया यांचा मोबाईलचे लोकेशन शोधले.
हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत पकडले
कानपूरमधील एका हॉटेलमध्ये कन्नौजिया यांचे मोबाईल नेटवर्क शेवटचे सक्रिय असल्याचे उघड झाले.पोलिसांनी हॉटलकडे धाव घेतली;पण तिथली परिस्थिती पाहून सगळेच थक्क झाले. डीवायएसपी कन्नौजिया यांना एका महिला कॉन्स्टेबलसह हॉटेलच्या खोलीत रंगेहाथ पकडण्यात आले.
पाेलीस महानिरीक्षकांनी केली हाेती कठोर कारवाईची शिफारस
उत्तर प्रदेश पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली. लखनौ परीक्षेत्रातचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) यांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्याचाच परिणाम म्हणजे कन्नौजिया यांच्यावर कारवाई करून त्यांची पदावनती करण्यात आली आहे. ते आता पोलीस उपअधीक्षक ( डीवायएसपी) पदावरुन हवालदार झाले आहेत. प्रांतिक आर्म्ड कॉन्स्टेब्युलरी (पीएसी) गोरखपूर बटालियनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.