दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील म्हैसाळ येथे कृष्णा नदीवर असणारा म्हैसाळ-कनवाड हा बंधारा पाण्याखाली गेल्याने सीमा भागातील लोकांचा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. शुक्रवारी व शनिवारी पश्चिम महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील लहान ओढे, नाले भरले आहेत. म्हैसाळ-कनवाड बंधारा पाण्याखाली गेल्याने सीमा भागातील शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
या भागातील लोक कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी व कोल्हापूर जिल्ह्यातील लोक या भागात येण्यासाठी या बंधाऱ्याचा वापर करतात. दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांची शेती नदीकाठी असल्याने याच बंधाऱ्यावरून शेती, व्यवसाय, उद्योग, शिक्षण यासह इतर कारणांनी दररोज शेकडो लोक या मार्गावरून प्रवास करीत असतात. मात्र, पावसाळ्यात हा बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक मिरज किंवा कागवाड मार्गे केली जाते.
जलपर्णी गेली वाहून
गेल्या काही दिवसांपासून नदीत जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्याने पाण्याचे प्रदूषण झाले होते. संपूर्ण नदीत जलपर्णी तरंगत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने जलपर्णी वाहून गेली आहे. मात्र, अजूनही थोडी शिल्लक आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.