भरपूर जागा गमावल्याने गडकरीनां पंतप्रधान करण्याची तयारी, संघाचीं पसंती कुणाला? ठाकरेही गडकरी असतील तर पाठीबां देणार?
आज सुरु असणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची बऱ्यापैकी कल समोर आले आहेत. सध्या ट्रेंडनुसार NDA च्या 300 पार जागा येतील असे वाटत नाही. भाजपला देखील मॅजिक फिगर असणारा 273 चा आकडा पार करता येईल असे वाटत नाही.
त्यामुळे सध्या भाजपने आपल्या बऱ्याच जागा गमावल्या असून आता पंतप्रधानपदी कोण बसेल यावरून चर्चा सुरु झाल्या आहेत. बऱ्याचशा जागा यावेळी भाजपने गमावल्या आहेत. त्यामुळे आता नितीन गडकरी यांना पंतप्रधान केले जाऊ शकते. नागपूर लोकसभा मतदारसंघातून गडकरी सध्या 70 हजार मतांनी पुढे असून ते विजयी वाटचाल करत आहेत. त्यामुळे आता नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात का? अशा चर्चा सुरु झाल्यात.
नितीन गडकरी यांचे RSS शी चांगले संबंध
नितीन गडकरी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नेहमीच चांगले संबंध असून ते आजवर मी संघाचा एक कार्यकर्ता आहे असे म्हणत आलेले आहेत. त्यामुळे RSS त्या दृष्टीने विचार करू शकतात. नितीन गडकरी हे भाजपचे असे नेते आहेत ज्यांच्या नावाला काही विरोधी पक्षही समर्थन देऊ शकतील.त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देखील 11 प्लस जागा दाखवत आहेत. त्यामुळे जर नितीन गडकरी हे नाव पुढे आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील त्यांना पाठिंबा देईल अशी चर्चा आहे. नितीन गडकरी यंदा तिसऱ्यांदा खासदार होत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची सध्या पंतप्रधानपदासाठी चर्चा सुरु आहे.
गडकरींचे विरोधकांशी चांगले संबंध
भाजपचे नितीन गडकरी यांचे गोडवे विरोधकही गातात. भाजपचे राजकीय शत्रू शरद पवार देखील गडकरी यांना मानणारे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात अपेक्षित संख्याबळ न मिळाल्याने आरएसएस देखील चिंतन करणार असल्याचे समजल्याने आता गडकरी पंतप्रधान होऊ शकतात अशा चर्चा सध्या सुरु झाल्यात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.