घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खरे तर, भारतात गेल्या काही वर्षामध्ये घरगुती गॅस ग्राहकांची संख्या कमालीची वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम उज्वला योजना सुरू केल्यापासून ग्राहक संख्या अधिक वाढली आहे. खेड्यापाड्यात आधी स्वयंपाकासाठी चुलीचा वापर होत असे. मात्र आता खेड्यातही बहुतांशी जनता गॅस चा वापर करत आहे. यामुळे महिलांची चुलीच्या धुरापासून सुटका झाली आहे. चुलीच्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत होता.
मात्र आता गॅसचा वापर वाढला असल्याने महिलांच्या आरोग्य देखील चांगले सदृढ राहणार आहे. अशातच मात्र काही ग्राहकांचे गॅस कनेक्शन रद्द केले जाऊ शकते अशी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जे ग्राहक केवायसी करणार नाहीत त्यांचे गॅस कनेक्शन रद्द होऊ शकते.
गॅस ग्राहकांसाठी केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र अजूनही अनेक ग्राहकांनी हे काम पूर्ण केलेले नाही. अनेकांची केवायसी रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना चांगल्याच अडचणी येत आहेत. यामुळे जे ग्राहक केवायसी करणार नाहीत त्यांचे कनेक्शन रद्द होऊ शकते असे म्हटले जात आहे. एवढेच नाही तर केवायसी न केलेल्या ग्राहकांना सबसिडीचाही लाभ मिळणार नाही. यामुळे लवकरात लवकर गॅस कनेक्शन धारकांनी केवायसी पूर्ण करावी असे आवाहन केले जात आहे. 30 जून पर्यंत केवायसी करण्यासाठी मुदत आहे.
या मुदतीत केवायसी चे काम पूर्ण करून घ्यावे अन्यथा उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी तीनशे रुपयांची सबसिडी तसेच गॅस कनेक्शन रद्द होऊ शकते. केवायसी करण्यासाठी ग्राहकांना संबंधित एजन्सीमध्ये भेट द्यावी लागणार आहे. आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, जोडणी ग्राहकांचे पुस्तक असे कागदपत्र केवायसी साठी लागणार आहेत. ग्राहकांचे फेस रीडिंग घेऊन केवायसी पूर्ण होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.