Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

थाई महिलांकडून देहव्यापार :, ठाण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उधवस्त

थाई महिलांकडून देहव्यापार :, ठाण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उधवस्त 


ठाण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी हे रॅकेट उद्ध्वस्त केलं. थाई महिलांच्या साथीने हे सेक्स रॅकेट सुरू होतं. या प्रकरणी पोलिसांनी बागदी अब्दुल्ला नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे.
थाई महिलांना बनावट आधार आणि पॅन कार्ड बनवून देण्यासाठी मदत करण्याचं त्याने आश्वासन दिलं होतं. त्या बदल्यात तो या महिलांकडून शरीर विक्रयचा धंदा करून घेतल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

बागदी अब्दुल्ला मुगेद साद (वय 42) असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांना गेल्या आठवड्यातच या रॅकेटची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मानवी तस्करी विरोधी पथकाच्या एका टीमला एका हॉटेलात पाठवलं. या टीमने हॉटेलात छापेमारी केली. यावेळी एका 44 वर्षीय थाई महिलेला अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली.

थाई महिलांची फसवणूक
या हॉटेलमधून तीन थाई महिलांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. या चारही महिलांची चौकशी केल्यानंतर अब्दुल्ला सादने त्यांना बनावट पॅनकार्ड आणि आधार कार्ड मिळवून देण्यात मदत केली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अब्दुल्ला मुगेद साद आणि या चारही थाई महिला पासपोर्ट आणि व्हिजाचा अवधी संपल्यानंतरही भारतात राहत होते. या सर्वांविरोधात पोलिसांनी विदेशी नागरिक अधिनियमच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
हायप्रोफाईल सेक्स रॅकेट

याच वर्षी ठाण्यात फेब्रुवारीत एक हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. या रॅकेटमध्ये फिल्म अभिनेत्रींचा सर्वाधिक समावेश होता. यातील अनेक नट्या पैसे कमावण्याच्या लालसेपोटी तर अनेकजणी मजबुरीने या धंद्यात ओढल्या गेल्या होत्या. एका फिल्म प्रोडक्शनच्या आडून हा धंदा सुरू होता.

अभिनेत्रींना पैशाची लालूच
एका लग्जरी हॉटेलात पोलिसांनी तेव्हा छापेमारी केली होती. एक सिने निर्माताच हा धंदा चालवत असल्याचं समोर आलं होतं. सोलोमन रत्नमय्या नरकंथेलू असं या निर्मात्याचं नाव होतं. त्याला पोलिसांनी अटक केली होती. हिंदी सिनेमा, टीव्ही सीरिअल, वेब सीरीज, फोटो शूट आणि यूट्यूब व्हिडीओत काम करणाऱ्या अभिनेत्रींना एक्स्ट्रा पैसा कमावण्याची लालच दाखवून तो देह व्यापाराच्या धंद्यात त्यांना ढकलत होता. पोलिसांनी तेव्हाही या अभिनेत्रींची सुटका केली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.