सांगलीत गहाळ झालेले महागडे मोबाईल नागरिकांना दिले परत शहर पोलिसांची कामगिरी, ३१ जणांना पावणेचार लाखांचे मोबाईल मिळाले
सांगली : सांगली शहरातील विविध ठिकाणांहून गहाळ झालेले तब्बल ३.७७ लाखांचे ३१ मोबाईल नागरिकांना सोमवारी एका समारंभात परत करण्यात आले. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याहस्ते संबंधित नागरिकांना या मोबाईलचे वाटप करण्यात आले. यावेळी अधीक्षक घुगे यांनी शहर पोलिस आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या या कामगिरीचे कौतुक केले.
सांगली शहर पोलिस ठाणे हद्दीच्या विविध भागांतून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते. त्याबाबतच्या तक्रारी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आल्या होत्या. शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी हे मोबाईल शोधून संबंधित नागरिकांना ते परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या. पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तब्बल ३.७७ लाखांचे ३१ मोबाईल शोधून काढले. त्यानंतर ते ज्यांच्या मालकीचे होते त्यांना सोमवारी एका कार्यक्रमात अधीक्षक घुगे यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, सचिन शिंदे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, विनायक शिंदे, गणेश कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.