Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बीडच्या सरपंचांची गोळ्या झाडून हत्या; शरद पवार गटातील पाच नेत्यांवर गुन्हा दाखल

बीडच्या सरपंचांची गोळ्या झाडून हत्या; शरद पवार गटातील पाच नेत्यांवर गुन्हा दाखल

बीड : बीडच्या परळीमध्ये धक्कादायक राजकीय हत्या करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांची हत्या करण्यात आली. रात्री त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणामध्ये शरद पवार गटातील पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पवार गटातील नेते बापू आंधळे यांच्या हत्येमागील कारण ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

बीडच्या परळी शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते व मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून निघृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारामध्ये आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबार प्रकरणामध्ये शरद पवार गटातील नेत्यांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह अन्य चार जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे हत्येमागचे कारण?

या गोळीबार प्रकरणामध्ये हत्येमागचे प्राथमिक कारण समोर आले आहे. या कारणामुळे सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. अर्थिक व्यवहारातील देवाणघेवाणीवरुन बापू आंधळे यांनी हत्या करण्यात आली आहे. असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. बबन गीते यांनी मृत बापू आंधळे यांना बोलावून घेत पैसे आणलेस का? अशी विचारणा करत गोळीबार केल्याचे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. बबन गीत हे शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. या हत्येमुळे बीडमधील राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पंकजा मुंडे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची आत्महत्या आणि त्यानंतर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणे या प्रकरणानंतर बीडमध्ये राजकीय वातावरण गढूळ झाल्याची चर्चा सर्वत्र आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.