Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मचाऱ्यांची कपात केल्यास, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळास ठोकणार टाळे .:-राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

कर्मचाऱ्यांची कपात केल्यास, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळास ठोकणार टाळे .:-राज्य प्रवक्ते संतोष पाटील. 


विजयनगर सांगली येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या ऑफिस मधली पाच पैकी चार कर्मचारी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक बोर्डाने व राज्य सरकारने कपात केल्याची बातमी आमच्या पर्यंत धडकली आहे. मराठा समाजातील तरुणांसाठी व्याज परतावा योजना राबवणाऱ्या या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असून यामध्ये पाच कर्मचारी होते ते आधीच्या कामकाजावरून ही संख्या अपुरी होतीच. या पाच पैकी चार कर्मचाऱ्यांची कपात करून मराठा समाजाच्या तरुणाची चेष्टा राज्य सरकारने केली आहे असे दिसून येते. 

जर सांगलीच्या जिल्हाधिकारी व महामंडळाच्या अध्यक्षांनी व राज्य सरकारने लवकरात लवकर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सांगली या शाखेसाठी पाच पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती न केल्यास अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसला कुलूप लावण्यात येईल अशी माहिती मराठा स्वराज्या संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.