Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नी शारीरिक संबध ठेवू देत नाही! तिचे अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून पतीकडून खून

पत्नी शारीरिक संबध ठेवू देत नाही! तिचे अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून पतीकडून खून 


देहूगाव:  ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. देहूगाव येथील गाथा मंदिर मागील आनंद डोह घाट  परिसरात (दि.२०) सायंकाळी साडेसात ते नऊ वाजताच्या सुमारास ही खुनाची घटना घडली.

प्रतीक्षा जयदीप यादव (वय.२१) असं खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती जयदीप अर्जुन यादव ( वय २९, रा.देहूगाव, मूळ.रा.चिखलगोल,सांगली ) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अंमलदार किरण राजाभाऊ पाटील यांनी (दि २१) याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा आणि जयदीप यादव हे दोन महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकले. जयदीप हा खाजगी कंपनीत नोकरीला आहे. गेल्या आठवडापूर्वी ते देहूगाव येथे राहावयास आले होते. पत्नी शारीरिक संबंध  ठेऊ देत नाही तसेच तिचे अनैतिक संबंध  असल्याचा संशय जयदीप याला होता.

दरम्यान, प्रतीक्षा आणि जयदीप हे दोघे गुरुवारी सायंकाळी देहूगाव येथील आनंद डोह घाट परिसरात फिरायला गेले. तेथे ओढणीने गळा आवळून जयदीप याने तिचा खून केला. तसेच गुन्हा लपविण्यासाठी तिचा व स्वतःचा मोबाइल घटनास्थळा जवळील इंद्रायणी नदीत  टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात  हॉस्पिटल शवविच्छेदन करून प्रतीक्षाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे तपास करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.