मुंबईः राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, निवडणुका समोर ठेऊन सादर केलेला अर्थसंकल्प आहे. वेगवेगळ्या घोषणा यामध्ये केलेल्या आहेत.. चांगल्या आहेत, पण वेळ नाहीये. सध्या राज्य सरकारवर 7 लाख कोटींचे कर्ज आहे. पण कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही तर नवीन योजनांसाठी कुठून पैसा येणार? अशी टीका त्यांनी केली.
एकनाथ खडसे हे मागच्या काही महिन्यांपासून भाजपच्या वाटेवर आहेत. पंधरा दिवसांमध्ये आपला पक्षप्रवेश होईल, असं म्हणणाऱ्या खडसेंना भाजपने वेटिंगवर ठेवलं आहे. तर त्यांच्या सून रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं आहे. तरीही खडसेंनी राज्य सरकारला घरचा आहेर देत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प असल्याचं म्हटलंय.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी चालू आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी वित्त व नियोजनमंत्री म्हणून मार्च 2011 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हापासून त्यांनी आज सादर केलेला दहावा अर्थसंकल्प आहे.उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवातंच जगद्गगुरु संत तुकाराम महाराजांच्या 'उदंड पाहिले, उदंड ऐकिले... उदंड वर्णिले, क्षेत्रमहिमे | ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर... ऐसा विटेवर , देव कोठे || ऐसे संतजन , ऐसे हरिचे दास... ऐसा नामघोष , सांगा कोठे | तुका म्हणें, आम्हां अनाथाकारणें... पंढरी निर्माण, केली देवें... ||' या अभंगाने केली.
महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी 'मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ', पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपये, 'निर्मल वारी'साठी 36 कोटींचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.