उल्हासनगर : दारूसोबत चखणा दिला नाही म्हणून बेवड्यांनी राडा घातला आहे. उल्हासनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चखणा मिळाला नाही म्हणून बिअरच्या बाटल्या फेकत टोळीने हैदौस घातला आहे, याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. उल्हासनगरच्या हिमालया रेस्टॉरंट आणि बारवर तीन ते चार जणांच्या टोळीने बिअरच्या बाटल्या फेकल्या. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. टोळक्याचा हा हैदौस पाहण्यासाठी बघ्यांची गर्दीही झाली होती.
चखणा मिळाला नाही म्हणून आरोपी राजू सरदार आणि त्याच्या साथीदारांनी हॉटेल मॅनेजरला मारहाण केली, तसंच बिअरच्या बाटल्या दुकानावर फेकून मारल्या. याप्रकरणी बार मालकाने पोलीस तक्रार दाखल केली आहे, तसंच ही टोळी कायमच असा त्रास देत असल्याचा आरोपही बार मालकाने केला आहे. तसंच फुटलेल्या बाटल्यांच्या काचा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना लागल्याचा दावाही बार मालकाने केला आहे.
याआधी काहीच दिवसांपूर्वी लखनऊमध्ये दारू पिताना सुनेने पनीर दिलं नाही म्हणून सासूने घरात राडा केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. सुनेनं या प्रकारानंतर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. तसंच सुनेचा संसारही मोडण्याच्या मार्गावर पोहोचला, अखेर हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवण्यात आलं.सासू रोज दारू पिते आणि चखणा म्हणून पनीर टिक्का आणि इतर पदार्थांची मागणी करते. सुरूवातीला आपण सासूने मागितलेले पदार्थ दिले पण रोज दारू प्यायला नकार दिल्यानंतर सासूने भांडणाला सुरूवात केली, असा आरोप सुनेने केला आहे. भांडणं वाढल्यानंतर सून माहेरी निघून गेली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.