भाजपा खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड, आवाजी मतदानामध्ये मिळवला विजय
अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपा खासदार ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश यांच्यामध्ये निवडणूक झाली.
त्यामध्ये ओम बिर्ला यांनी आवाजी मतदानामध्ये विजय मिळवल्याचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी जाहीर केले. त्यानंतर पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना सन्मानाने लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे नेत स्थानापन्न केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.