Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खुशखबर, एलपीजी सिलेंडर स्वस्त, असे आहेत नवीन दर

खुशखबर, एलपीजी सिलेंडर स्वस्त, असे आहेत नवीन दर

देशात लोकसभा निवडणुकीचा अंतीम टप्पा आज होत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी येणार आहे. निवडणूक निकालापूर्वी चांगली बातमी आली आहे. 1 जून 2024 पासून देशभरात एलपीजी सिलेंडर सस्ता झाले आहेत. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी कपात केली आहे. IOCL च्या वेबसाइटनुसार 19 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरचे दर कमी केले आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत आता नवीन दर लागू झाले आहे.

मुंबईत 69.50 रुपये स्वस्त

एलपीजी सिलेंडरचे दर 1 June 2024 पासून नव्याने लागू केले आहे. आईल कंपन्यांनी दरात कपात केली आहे. लोकसभा निवडणूक निकाल येण्यापूर्वी एलपीजी सिलेंडर वापर करणाऱ्यांना चांगली भेट मिळाली आहे. आईल कंपन्यांनी हा बदल 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरबाबत केला आहे. 1 जूनपासून दिल्लीत 69.50 रुपये, कोलकातामध्ये 72 रुपये, मुंबईमध्ये 69.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 70.50 रुपये सिलेंडर स्वस्त झाले आहे.

मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 1629 रुपयांवर

सलग तिसऱ्या महिन्यात कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. यापूर्वी, एप्रिल आणि मेच्या सुरुवातीला किंमत कमी केली होती. IOCL च्या वेबसाइटवर नवीन सिलिंडरच्या किंमती अपडेट केल्या गेल्या आहेत. दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 1745.50 रुपयांऐवजी आता 1676 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1859 रुपयांऐवजी 1787 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1698.50 रुपयांना विकला जात होता, तो आता 1629 रुपयांवर आला आहे. तर चेन्नईमध्ये 1911 रुपयांना विकल्या जाणाऱ्या सिलेंडरची किंमत 1840.50 रुपयांवर आली आहे.

घरगुती सिलेंडरचे दर असे

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. ते स्वस्त केल्यामुळे हॉटेल आणि बाहेरचे खाणे-पिणे स्वस्त होऊ शकते. परंतु घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत घरगुती सिलेंडरची किंमत 803 रुपये आणि उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी 603 रुपये आहे. कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना घरगुती सिलिंडर मिळत आहे. यापूर्वी महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांपर्यंत कपात केली होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.