सांगलीतील दहा सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या..
सांगली : सांगली जिल्ह्यातील दहा सहायक पोलिस निरीक्षकांच्या जिल्हाअंतगर्त बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ५ जणांच्या प्रशासकीय तर ५ जणांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. पदोन्नती झालेल्या १३ सहायक निरीक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेशही पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सहीने बुधवारी रात्री उशीरा काढण्यात आले आहेत. संदीप शिंदे यांचौ कुपवाड एमआयडीसीचे, संदीप कांबळे यांची उमदीच्या तर भगवान पालवे यांची भिलवडी पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकीय बदली झालेले अधिकारी कंसात कोठून कोठे : जयंत जाधव (आटपाडी ते कोकरूड), विक्रम पाटील (मिरज शहर ते कुरळप), हरिश्चंद्र गावडे (इस्लामपूर ते कासेगाव), सुशांत पाटील (सांगली ग्रामीण तै पलूस), संदीप कांबळे (विश्रामबाग ते उमदी),
विनंतीनुसार बदली झालेले अधिकारी कंसात कोठून कोठे : संदीप संदीप शिंदे (उमदी ते कुपवाड एमआयडीसी), सुनील गिड्डे (मिरज शहर ते वाहतूक शाखा मिरज), भगवान पालवें (वाहतूक शाखा मिरज तै भिलवडी), नितीन सावंत (भिलवडी ते एलसीबी), राजेश माने (एलसीबी ते वाहतूक शाखा इस्लामपूर). बदली झालेल्या अधिकाऱ्यांना संबंधितांनी तातडीने कार्यमुक्त करून बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी नव्या नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.