Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लघविच्या एका थेंबांने मित्राला बनवले खुनी!

लघविच्या एका थेंबांने मित्राला बनवले खुनी!


उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून, लघवीच्या थेंबावरून मित्रांमध्ये वाद झाला आणि वाद इतका वाढला की प्रकरण हत्येपर्यंत पोहोचले. मित्राने आपल्याच एका मित्राची हत्या केली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

लघवीचे शिंतोडे आणि निर्घृण हत्या

प्रकरण सिकंदराबाद, बुलंदशहरचे आहे. सिकंदराबाद कोतवाली परिसरातील सराईघासी गावात दारू पार्टी करून काही मित्र घरी जात असताना एका मित्राला लघवीला सुरुवात झाली. लघवीचे काही शिंतोडे एका मुलावर पडले, ज्याने लघवी करणाऱ्या व्यक्तीला रागाने चापट मारली. या थप्पडमुळे लघवी करणाऱ्या व्यक्तीला राग आला आणि त्याने आपल्याच मित्रांची निर्घृण हत्या केली.
लघवीचा शिडकावा झाल्याने राहुल नावाच्या मुलाने अंकुर नावाच्या मुलाला चापट मारली. यामुळे अंकुर इतका संतप्त झाला की त्याने राहुलवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा जीव घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, मित्रांचा ग्रुप दारू पार्टी करून घरी परतत होता.

मित्राची हत्या करून मारेकरी अंकुर फरार झाला आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी राहुलचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पार्टीत सहभागी झालेल्या इतर मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, हा वाद कशामुळे व का झाला हेच कळत नाही? एक वाजण्याच्या सुमारास त्यांना मृतावस्थेत दिसले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेपूर्वी मित्रांमध्ये वाद झाल्याचे कुटुंबीयांनी मान्य केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.