निरोगी आरोग्यासाठी शारीरिक स्वच्छता महत्वाची असते. न केवळ बाहेरून तर आतूनही आपले शरीर स्वच्छ असेल तरच निरोगी जगता येते. बिघडती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या शारीरिक आरोग्याची पुरेपूर वाट लावत असतात.
डोळ्यांना न दिसणारी शरीराच्या आतील घाण आपल्या आजारपणाचे कारण असते. तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर तुम्हाला तुमचे शरीर आतून स्वच्छ करणे गरजेचे आहे. यासाठी काय कराल? तर डिटॉक्स डाएट प्लॅन फॉलो करा. याविषयी जर तुम्हाला माहित नसेल तर चिंता करू नका. ही बातमी स्किप न करता वाचा आणि डिटॉक्स प्लॅनविषयी सविस्तर माहिती घ्या.
डिटॉक्स डाएट प्लॅन फॉलो करण्याचे फायदे
शरीरात साचलेली घाण काढून टाकण्यासाठी डाएट फॉलो मदत करते. यासाठी तुम्ही चांगला आणि योग्य डिटॉक्स डाएट फॉलो करायला हवा. तरच तुमचे शरीर व्यवस्थित डिटॉक्स होईल आणि आरोग्य राखले जाईल. चांगले डिटॉक्स डाएट तुमच्या शरीरात साचलेले विषारी द्रव्ये काढून टाकण्यास मदत करतात आणि शरीराला आतून स्वच्छ करतात. चला तर मग जाणून घेऊया शरीरातील घाण काढण्यासाठी डिटॉक्स डाएट प्लॅनमध्ये काय खावे?
सकाळचा नाश्ता
डिटॉक्स डाएट प्लॅनमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो सकाळचा नाश्ता. या डाएटमध्ये सकाळच्या नाश्त्यात भाज्या बारीक चिरून त्यासोबत मोड आलेले मूग खावे किंवा रव्याच्या उपम्यात विविध भाज्या घालून खावा. याशिवाय उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग खावा.
मिड मॉर्निंग मिल
डिटॉक्स डाएटमध्ये मिड मॉर्निंग मिलसाठी १ लहान वाटी मिक्स्ड फ्रूट सॅलड किंवा १ ग्लास ताज्या संत्र्याच्या रस प्यावा.
दुपारचे जेवण
हे डाएट फॉलो करताना दुपारच्या जेवणात मिक्स भाज्यांसोबत ब्राउन राईसचा पुलाव, रायता किंवा पालक पनीर, गव्हाची पोळी आणि काकडीचे सॅलड खावे.
संध्याकाळचा नाश्ता
संध्याकाळचा नाश्त्यासाठी भाजलेला मखाना हळद आणि जिरे घालून शिजवून खा किंवा चाट मसाला घालून भाजलेला हरभरा खाता येईल.
रात्रीचे जेवण
डिटॉक्स डाएटमध्ये रात्रीच्या जेवणात १ वाटी दुधी भोपळा किंवा एशगोर्डचे सूप आणि यासोबत काही हलक्या भाजलेल्या भाज्या खा. याशिवाय मेथीच्या पानांसोबत शिजवलेली डाळ सुद्धा खाता येईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.