उत्तर प्रदेश-तेलंगणानंतर आता 'या' राज्यात सिगारेट, तंबाखूच्या विक्रीवर बंदी
उत्तर प्रदेश आणि तेलंगणानंतर आता जम्मू-काश्मीरच्या कटरामध्ये धुम्रपानावर बंदी घालण्यात आलीय. याठिकाणी सिगारेट आणि तंबाखूच्या विक्री, साठवणूक अन् सेवनावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, माता वैष्णोदेवीजवळ असलेल्या कटरामधील काही भागातच हे निर्बंध लादण्यात आलेत.
कटरा जिल्हा दंडाधिकारी विशेष महाजन म्हणाले, “माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी लोक मोठ्या भक्तीभावाने येतात, संपूर्ण मार्गावर दारू आणि मांसावर बंदी आहे, परंतु बंदी असतानाही लोक सिगारेट आणि तंबाखूचे सेवन करताना आढळले.” त्यामुळे काल आम्ही नोमाई चेकपोस्ट, पंथाल चेकपोस्ट, तारकोट मार्गापासून कटरा येथील माता वैष्णो देवी भवनापर्यंत कोणत्याही प्रकारच्या तंबाखूच्या विक्री, साठवणूक आणि सेवनावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.
यूपीमध्येही विशेष प्रकारची संचारबंदी लागू
यापूर्वी यूपी सरकारने पान मसाला आणि तंबाखू खाणाऱ्या शौकिनांना मोठा झटका दिला होता. एकाच दुकानात पान मसाला आणि तंबाखूच्या विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे. ही बंदीही १ जूनपासून लागू झाली आहे.
तेलंगणातही संचारबंदी लागू
यापूर्वी तेलंगणा सरकारने तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली होती. रेवंत रेड्डी सरकारने एक आदेश जारी करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक, वितरण यावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 24 मे 2024 पासून लागू झाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.