हैदराबाद येथील शादनगर परिसरात अन्नराम गावातील श्रीकांत या 39 वर्षीय व्यक्तीचा जेवताना चिकनचा तुकडा घशात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. श्रीकांत हैदराबादला त्याच्या बहिणीला भेटायला गेला होता आणि कोठी येथील एका बारमध्ये जेवण करत होता.
चिकन बिर्याणी खाताना आणि दारूचे सेवन करत असताना चिकनचा तुकडा घशात अडकल्याने त्याचा श्वास कोंडला. झालल्या त्रासामुळे तो बारच्या बाहेर आला आणि रस्त्यावर कोसळला. स्थानिक रहिवाशांनी तातडीने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी श्रीकांतला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे. श्रीकांतचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी उस्मानिया जनरल हॉस्पिटलच्या शवागारात नेण्यात आला असून शादनगर येथील त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.