खा. विशाल पाटील यांनी घेतली अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट
सांगली : खासदार विशाल पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. सांगली लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता. विजयी झाल्यानंतर त्यांनी आज आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. पाटील यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांना दिले. यावेळी नेत्या अंजली आंबेडकर, राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.