Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कारमध्ये चुकूनही 'या ' ठिकांणी पाण्याची बाटली, बॉम्बसारखी फुटेल गाडी

कारमध्ये चुकूनही 'या ' ठिकांणी पाण्याची बाटली, बॉम्बसारखी फुटेल गाडी 


आपण कारने प्रवास करताना त्यात पाण्याची बाटली आवर्जून ठेवतो. त्यात आतासारखा उन्हाळा असेल तर एका बाटलीने काम भागत नाही. जवळचं पाणी संपलं की आपण विकत पाण्याच्या बाटल्या घेतो, बऱ्याचदा त्या बाटल्या रिकाम्या झाल्यावरही कारमध्ये ठेवतो.

मात्र बाटल्या ठेवणं धोकादायक ठरू शकतं. सध्या इतकं ऊन पडतंय की फोन, एसी ब्लास्ट होण्याच्या घटना घडत आहेत, अशातच गाडीत पाण्याची खाली बाटली ठेवणं महागात पडू शकतं. यामुळे गाडीत आग लागू शकते. अशा स्थितीत कारमध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नयेत आणि त्यामुळे कशाप्रकारे नुकसान होऊ शकते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे.
कारमध्ये प्लॅस्टिकची बाटली ठेवणं पडेल महागात

तुम्ही उन्हात गाडी पार्क करत असाल तर त्यात प्लॅस्टिकची बाटली ठेवण्याची चूक करू नका. इतकंच नाही तर तुम्ही पाणी प्यायलं असेल तर ती रिकामी बाटली बाहेर फेकून द्या, कारण जर ती बाटली गाडीत ठेवून तुम्ही निघून गेलात तर गाडीला आग लागण्याचा धोका असतो. प्लॅस्टिकची बाटली कारमध्ये मॅग्निफाईंग ग्लासप्रमाणे काम करते. थेट सूर्यप्रकाश बाटलीवर पडतो आणि त्याची रिॲक्शन होते, ज्यामुळे कारच्या सीटला आग लागू शकते. जर तुमची बाटली कोल्ड्रिंकची असेल तर ती देखील नुकसानकारकर ठरू शकते. बाहेरचं ऊन डायरेक्ट पडल्यावर त्या तापमानामुळे बाटली फुटण्याची शक्यता वाढू शकते.

कारमध्ये सॅनिटायझर किंवा लायटर ठेवणं टाळा
सध्या खूप ऊन पडत आहे, त्यामुळे या कडक उन्हात कारमध्ये लायटर ठेवणं म्हणजे आपली कार स्वतःच अडचणीत आणण्यासारखं आहे. खूप जास्त उन्हात लायटरमुळे आग लागण्याची शक्यता वाढते. हँड सॅनिटायझर ठेवल्याने तुमच्या हातावरील जंतू कदाचित मरणार नाहीत पण त्यामुळे गाडीला आग नक्कीच लागू शकते. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल मिसळलेलं असतं, ज्यामुळे कारला आग लागू शकते. त्यावर थेट सूर्यप्रकाश पडल्यास केमिकल रिॲक्शन होऊन आग लागण्याची शक्यता असते.

कारमध्ये गॅस एअरोसोल किंवा स्प्रे कॅन ठेवू नका - तापमानात खूप वाढ झाल्यामुळे कॅनच्या आत प्रेशर खूप वेगाने वाढू शकतं, ज्यामुळे कारमध्ये आग लागू शकते. एवढंच नाही तर कारमध्ये कोणतेही ज्वलनशील पदार्थ ठेवणंही टाळा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.