जंगलाच्या राजावर राज्यात संकट; वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले, धक्कादायक कारण आले पुढे
राज्यात वाघांच्या मृत्यूच्या नवीन आकडेवारीने सर्वांनाच धक्का बसला आहे. राज्य सरकार आणि वन विभागांच्या प्रयत्नांवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्राण्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप दिवसागणिक वाढत चालला आहे.
हवामानातील बदलामुळे प्राणी शिकारी आणि पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वसंरक्षणासाठी आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी केलेल्या उपायांनी जंगलाच्या राजाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. वाघांच्या मृत्यूच्या आकड्यांनी देशात एकच चर्चा सुरु झाली होती. त्यात राज्यातील आकडेवारी सुद्धा चिंता वाढविणारी आहे.
राज्यात वाघांच्या मृत्यूचं वाढलं प्रमाण
जानेवारी २०२४ ते मे २०२४ पर्यंत १६ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती विधीमंडळात सरकारने दिली. सरकारने छापील उत्तरातच ही कबुली दिली. २०१८ पासून मे २०२४ पर्यंत वीजेचा करंट लागल्यानं २२ वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक बाब आहे. स्वसंरक्षणासाठी मानवाने केलेल्या उपायांमुळे वाघांचा बळी गेला आहे.
२०२३ मध्ये ५१ वाघांचा मृत्यू
१.नैसर्गिकरीत्या -२६
२.अपघाताने-१०
३. विषबाधा-२
४. शिकारी-४
५. वीज करंट- ९
कृषीमंत्री आक्रमक
NDVI म्हणजे काय? यावरुन विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी NDVI म्हणजे काय? तुम्हाला माहित नाही का ?जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांना घेरले.त्याना उत्तर न देता आल्याने धनंजय मुंडे मदतीला धावले. तुम्हाला शेतकऱ्यांचे पडले की एनडीव्हीआयचे पडले आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांची चेष्टा करण्यासाठी चालला आहे का, असा आक्रमक पवित्रा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला. तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो, असे ते म्हणाले.
आम्हाला हा सभागृहात बरेच वर्ष झाले. जर मंत्री सभागृहात उपस्थित नसेल तर ठिक आहे. मात्र मंत्री सभागृहात असताना दुसऱ्या मंत्र्याने उभं राहणं योग्य नाही, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. NDVI मार्फत उपग्रहाच्या माध्यमातून फोटो काढून नुकसानीचा अंदाज घेतला जातो आणि मग नुकसानभरपाई दिली जाते. तुम्ही शेतकऱ्यांना गुमराह करू नका. मदत देणार आहात का ते सांगा. गोलमाल करू नका, असे पृथ्वीराज चव्हाण यांनीसरकारला धारेवर धरले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.