शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन त्यांनी शहाजीबापू पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली.
तसेच डॉक्टरांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली. याशिवाय त्यांनी लवकरात लवकर त्यांनी पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली. शहाजीबापू पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री आपले मूळगाव दरे येथे होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांची फोनवरून चौकशी केली होती.
दरम्यान, शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांना खंबीरपणे साथ दिली होती. तसेच त्यांचा गुवाहाटीमधील ‘काय झाडी, काय डोंगार’ असे म्हणत असलेले ऑडिओ क्लिप देखील चांगलीच चर्चेत आली होती. यामुळे त्यांना राज्यात चांगलीच ओळख मिळाली. तर विरोधकांनी यावरून त्यांच्यावर टीका देखील केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.