सोन्याची नाणी घेऊन फिरायचे, दागिन्यांच्या दुकानात तपासायचे; पुढे घडलं असं की...
लखनऊ : सोनं घ्यायचं असेल किंवा विकायचं असेल तर आपण सोन्याच्या दुकानात म्हणजे ज्वेलर्सकडे जातो. अशाचतीन व्यक्ती सोन्याची नाणी घेऊन अनेक ठिकाणी फिरत हबोते. दागिन्यांच्या दुकानात जाऊन त्याची तपासणीही करते होते. त्यानंतर जे घडलं त्यावर विश्वासच बसणार नाही. उत्तर प्रदेशमधील ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिलीभीत जिल्ह्यातील बिसलपूर पोलीस स्टेशन परिसरातील मोहल्ला दुबे शहरातील रहिवासी विवेक अग्रवालला सोन्याच्या नाण्यांची माहिती मिळाली. त्यात मोठा नफा असल्याचे समजल्यानंतर त्याने 13 रुपयांची खरेदी केली. आरोपींनी पीडित विवेक अग्रवालला सोन्याची नाणी विकण्यासाठी पुवायन येथील अवना मोरजवळ बोलावलं होतं.
दोन वेगवेगळ्या कारमध्ये 30 लाख रुपये घेऊन आलेल्या आरोपींनी आधी विवेकशी बोलून 30 लाख रुपये असलेली बॅग घेतली. सोन्याची नाणी घेऊन दुसरी कार येत असल्याचे त्यांनी सांगितलं होतं. यानंतर दुसरी कार आल्यावर तिघंही त्यात बसले आणि पळून गेले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर विवेकनं पुवायन पोलीस ठाण्यात जाऊन फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला.
सोन्याच्या नाण्याच्या बहाण्याने फसवणूक
सोन्याची नाणी विकण्याच्या नावाखाली 30 लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे लोक आधी सोन्याची नाणी दाखवून ज्वेलर्सचा विश्वास जिंकायचे आणि नंतर पैसे घेऊन त्याला निर्जन भागात बोलावायचे आणि तिथं त्याला आणखी नाणी देऊन पैसे घेण्यास तयार करायचे.
अशाच प्रकारे त्यांनी विवेक अग्रवाल नावाच्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकवून 30 लाख रुपये असलेली बॅग घेऊन पळ काढल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. नाणी दाखवण्यापूर्वी आरोपीने पीडिताकडून तीस लाख रुपये असलेली बॅग घेतली आणि त्याला थांबण्यास सांगितलं. त्यानंतर दुसरी कार आली आणि ते पळून गेले. यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली.
नाणी जप्त, आरोपींना अटक
पोलिसांनी खबऱ्याच्या माहितीवरून सोन्याची नाणी दाखवून नंतर सौदेबाजी करून फसवणूक करणाऱ्या 3 गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन आरोपी लखीमपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सहा लाख रुपयांची रोकड आणि पन्नास बनावट पिवळ्या धातूची नाणी जप्त केली आहेत. चौकशीनंतर पोलिसांनी आरोपींना कारागृहात पाठवलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.