Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सेक्स करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यावर दबाव :, अब्जाधीश उद्योजक एलन मस्क यांच्यावर गंभीर आरोप

सेक्स करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यावर दबाव :, अब्जाधीश उद्योजक एलन मस्क यांच्यावर गंभीर आरोप 


टेस्ला आणि एक्ससह अनेक मोठ्या कंपन्यांचे सीईओ एलोन मस्क हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. स्पेसएक्सच्या महिला कर्मचाऱ्यांनी एलन मस्क यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मस्क यांनी स्पेसएक्सचा एक कर्मचारी आणि माजी इंटर्नसोबत लैंगिक संबंध ठेवले आणि आपल्या कंपनीतील एका महिलेवर आपले बाळ जन्माला घालण्यास दबाव टाकला, अशी माहिती वॉल स्ट्रीट जर्नलने दिली.

स्पेसएक्समध्ये काम करणाऱ्या एका महिला फ्लाइट अटेंडंटने सांगितले की, २०१६ मध्ये एलन मस्कने सेक्सच्या बदल्यात तिच्यासाठी घोडा खरेदी करण्याची ऑफर दिली. २०१३ मध्ये स्पेसएक्समधून राजीनामा देणाऱ्या एका माजी कर्मचारी महिलेने सांगितले की, एलन मस्कने तिला आपल्यासाठी मुले जन्माला घालण्यास सांगितले. आणखी एका महिलेने सांगितले की, २०१४ मध्ये एलन मस्क यांनी महिनाभर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र, काही दिवसानंतर त्यांच्यात वाद झाला आणि तिला कंपनी सोडण्यास भाग पाडले. एवढेच नव्हेतर, एलन मस्क अनेकदा स्पेसएक्सच्या महिला कर्मचाऱ्यांना घरी बोलवून घेत असे.
अवैध ड्रग्जचा वापर केल्याचा आरोप

हे प्रकरण केवळ शारीरिक संबंधांपुरते मर्यादित नसून त्यांच्यावर अवैध ड्रग्जचा वापर केल्याचा आरोपही केला जात आहे. एलन मस्कने त्यांच्यामुळे कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांमध्ये अवस्थता निर्माण झली.इलॉन मस्क, काही बोर्ड सदस्यांसह, काही वेळा एलएसडी, कोकेन, एक्स्टसी, मशरूम आणि केटामाइन या औषधांचा वापर केला होता, असेही अहवालात म्हटले आहे.

एलन मस्क यांनी ओपनएआयवरील खटला मागे घेतल्याचे वृत्त
एलन मस्क आणि ओपनएआय यांच्यातील तणाव अलीकडे काहीसा कमी झाला असून मस्क यांनी कंपनी आणि त्याचे सहसंस्थापक सॅम ऑल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमॅन यांच्याविरोधात कॅलिफोर्निया राज्य न्यायालयात दाखल केलेला खटला मागे आहे. मस्क यांनी ओपनएआयच्या अॅपलसोबतच्या नव्या भागीदारीवर जाहीर टीका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा खटला मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार हे प्रकरण पूर्वग्रहाने फेटाळण्यात आले आहे. ओपन एआय, सहसंस्थापक सॅम ऑल्टमन आणि सीईओ ब्रायन ब्रॉकमॅन यांनी आपला विश्वासघात केला आहे. २०१९ मध्ये झालेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा दावा मस्क यांनी फेब्रुवारी महिन्यात केला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.