Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली विधानसभा क्षेत्रात मतदार नोंदणीची विशेष मोहीम आमदार गाडगीळ : नवमतदार, यादीतून नावे गहाळ असलेल्यांची पुन्हा नोंदणी

सांगली विधानसभा क्षेत्रात मतदार नोंदणीची विशेष मोहीम आमदार गाडगीळ : नवमतदार,  यादीतून नावे गहाळ  असलेल्यांची पुन्हा नोंदणी


सांगली, दि.२९ : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या वतीने सांगली विधानसभा मतदारसंघात नवमतदारांची नोंदणी आणि मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांची पुन्हा नोंदणी अशी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. आमदार गाडगीळ यांनी याबाबत माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार व मार्गदर्शक तत्त्वानुसार नवमतदारांची या मोहिमेत नोंदणी केली जाईल.तसेच लोकसभा निवडणुकीत ज्यांची नावे मतदार यादीतून गहाळ झाल्याचे आढळले होते अशांची नावेही या मोहिमेत पुन्हा मतदार यादीत नोंदवली जातील.

आमदार गाडगीळ म्हणाले, नव मतदारांची नोंदणी हे या मोहिमेचे एक उद्दिष्ट आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे गहाळ झाल्याचा प्रकार आढळून आला होता.त्यामुळे त्या मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले होते. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागणे हे अयोग्य आहे. त्यामुळेच आम्ही एक विशेष मोहीम राबवून नव मतदारांची त्याबरोबरच लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदार यादीतून ज्यांची नावे गहाळ झाली आहेत त्यांचीही पुन्हा नोंदणी करणार आहोत.  लोकशाही बळकटीकरणाच्या या प्रक्रियेला सांगली विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा. या मोहिमेची अंमलबजावणी मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागात प्रभागनिहाय  केली जाईल. 

माझ्या जनसंपर्क कार्यालयात मतदार नोंदणी प्रक्रियेची व्यवस्था केलेली आहे.ह्याच सोबत शहरातील सर्वच प्रभागात हे मतदान नोंदणी अभियान टप्प्याटप्प्याने राबवणार आहोत.
रविवार दिनांक 30 जून पासून तीन दिवस शहरातील काही भागात
मतदार नोंदणीसाठी  संपर्क अभियान सुरू केले आहे त्याची केंद्रे:


१)गावभाग –
 ठिकाण :- उर्मिला उदय बेलवलकर. भारतीय जनता पक्ष संपर्क कार्यालय,
, झुंजार चौक,सांबारे रोड,गावभाग, सांगली 
संपर्क नं.7378997205 , 7507419999

२)विश्रामबाग 
ठिकाण- जनसंपर्क कार्यालय,गितांजली ढोपे-पाटील,
भबान हॉस्पिटल शेजारी, गुरुकुल इंग्लिश स्कूलसमोर,
१०० फुटी सांगली.
संपर्क नं. -9960774802 ,9764062041

३)विश्रामबाग 
ठिकाण - संजय कुलकर्णी जनसंपर्क कार्यालय 
८० फुटी रोड सिद्धेश्वर टॉवर,एमएसईबी
 इंटेक्स भवनसमोर, विश्रामबाग, सांगली
 संपर्क:-9422040045

४) यशवंतनगर 
ठिकाण - विश्वजीत पाटील जनसंपर्क कार्यालय, 
मराठा चौक वसंतनगर गणपती मंदिर कमानीशेजारी, 
यशवंतनगर, सांगली
संपर्क:-9823177744


५)अहिल्यानगर 
 ठिकाण - वार्ड क्रमांक १,आंबा चौक अहिल्यानगर कुपवाड.
संपर्क - नवनाथ खिलारे – 7385834422
रवींद्र सदामते – 9372391266

६] अभयनगर - 
ठिकाण- गजलक्ष्मी पार्क दत्त मंदिर 
पाण्याचे टाकीजवळ अभय नगर सांगली 

संपर्क - अतुल माने  - 9823606151
बंडू सरगर  - 9858999711
रविंद्र ढगे - 8275913888
प्रविण कुलकर्णी  - 7972141523
राजू पठाण - 7350150666

७] वानलेसवाडी 
 ठिकाण - दत्त मंदिर, व्हनमाने टेलर जवळ, 
नागराज कॉलनी, वानलेसवाडी, सांगली. 
माजी नगरसेविका-  सविताताई मदने
   9595191333 , 7058439999

माजी नगरसेविका – अप्सरा वायदंडे 
 9075989971 

८] विजयनगर 
 ठिकाण -  विजयनगर गणपती मंदिर विजयनगर सांगली
 महेश सागरे – 8208366003 , 8625031913

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.