Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विशाल पाटलांचा आवाज दिल्लीमध्ये घुमला, संसदेबाहेर.....

विशाल पाटलांचा आवाज दिल्लीमध्ये घुमला, संसदेबाहेर.....


शिंदें-फडणवीसांच्या पाडावासाठी एकजूट दाखविलेल्या आघाडीला 'चॅलेंज' करून अपक्ष विशाल पाटील खासदार झाले. खासदार झाल्या झाल्या त्यांनी काँग्रेसला पाठींबा दिला. फक्त पाठींबा देवूनच ते थांबले नाही तर पहिल्याच अधिवेशनावेळी संसदेबाहेर त्यांचा काँग्रेसच्या आंदोलनात झाले. दिल्लीतही त्यांचा आवाज घुमला.
काँग्रेसने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेत असताना संसदेच्या आवारात आंदोलन केले. त्यावेळी अपक्ष विशाल पाटील या आंदोलनात सहभागी होत घोषणा देत होते.
पांढरा कुर्ता आणि पायजमा घातलेले विशाल पाटील  सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत देखील त्यांनी संसदेबाहेर घोषणाबाजी केली. संसदेच्या पायऱ्यांवर देखील विशाल पाटील हे वर्षा गायकवाड, संजय दिना पाटील, शोभा बच्छाव यांच्यासोबत घोषणा देत होते.

विशाल पाटलांमुळे काँग्रेसची 'सेंच्युरी'
काँग्रेसला  लोकसभेत 99 जागा मिळाल्या आहेत. तर, अपक्ष विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठींबा दिल्याने काँग्रेसची सेंच्युरी पूर्ण झाली आहे. विशाल पाटील यांनी निवडणूक जिंकल्यानंतर दिल्लीत जावून सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेत काँग्रेसला पाठींबा जाहीर केला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.