नवी दिल्ली - OTT प्लॅटफॉर्मवर अलीकडेच एक सिनेमा रिलीज झाला होता. ही फिल्म एक फ्लाइट अटेंडेंट सोने तस्करीवर बनवण्यात आली. सिनेमाप्रमाणेत रिअल लाईफमध्येही असेच एक प्रकरण समोर आलं आहे. केरळच्या कन्नूर विमान तळावर एअर इंडियाच्या एअर हॉस्टेसला अटक करण्यात आली आहे. केबिन क्रूकडे जवळपास १ किलो सोने जप्त करण्यात आलंय.
सीक्रेट माहितीनुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कोलकाता येथील सुरभी खातून हिला तेव्हा थांबवलं जेव्हा ती मस्कटहून उड्डाण घेऊन आली होती. तिची पडताळणी केली तेव्हा तिने प्रायव्हेट पार्टमध्ये ९६० ग्राम सोनं लपवलं होतं. खातूनला अटक करून कोर्टात हजर केले तेव्हा तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मस्कटहून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून केबिन क्रूच्या माध्यमातून सोने तस्करी होणार असल्याची आम्हाला गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही जेव्हा ही फ्लाईट आली तेव्हा तपासणी केली. त्यात एअर हॉस्टेस सुरभी खातून हिने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलेले जवळपास १ किलो सोने जप्त करण्यात आले. आता तिच्या सहकाऱ्यांकडून आणि सोने तस्करीत सहभागी नेटवर्कचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितले.
सूत्रांनुसार, सुरभीनं चौकशीत काही नावांचा खुलासाही केला. ज्या लोकांनी सुरभीला या कामासाठी पैसे दिले होते. सोने तस्करीसाठी तिला कमिशन दिलं जात होतं. आता सुरभी तपास अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकली असून तिच्यासोबत आणखी कुणी केबिन क्रू यात सहभागी आहे का याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे सोने तस्करी प्रकरणी आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे.दरम्यान, सुरभी खातून याआधीही अनेकदा सोने तस्करीत सहभागी असल्याचं समोर आलं आहे. रॅकेटमध्ये सहभागी केरळमधील काही लोकांची चौकशीही होणार आहे. मागील वर्षी केरळच्या कोच्ची विमानतळावर १.४५ किलो सोने तस्करीत एअर इंडियाच्याच केबिन क्रूला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सूरभी खातून या एअर हॉस्टेसला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोन्याचा आकार अशाप्रकारे बनवण्यात आला होता जेणेकरून ते प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवले जाईल हे पाहून तपास अधिकारीही हैराण झाले. सुरभी खातूनला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.