Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेतात खोदकाम करताच निघाले पैशांचे बंडल; संपूर्ण प्रकरण जाणून पोलीसही हैराण

शेतात खोदकाम करताच निघाले पैशांचे बंडल; संपूर्ण प्रकरण जाणून पोलीसही हैराण

लखनऊ : पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने प्रेयसीला खूश करण्यासाठी दरोड्याची खोटी कहाणी रचणाऱ्या तरुणाला अटक केली. तसंच त्याच्या सांगण्यावरुन शेतात खोदकाम करत 4 लाख 96 हजार रुपये जप्त केले. ही अजब घटना इटावामधून समोर आली आहे. इटावाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी सांगितलं की, दरोड्याची माहिती मिळताच इटावाची गुन्हे शाखा आणि फ्रेंड्स कॉलनी पोलिसांनी संयुक्तपणे या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. घटना खोटी वाटताच त्यांनी दरोड्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत विचारपूस सुरू केली आणि एक वेगळीच गोष्ट समोर आली.

इटावा जिल्ह्यातील इकदिल भागातील रितौर गावात राहणाऱ्या अजय भदौरिया नावाच्या तरुणाने दरोड्याची खोटी माहिती दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. यानंतर अजयला अटक करण्यात आली आहे. अजयच्या ताब्यातून 4 लाख 96 हजार रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. दरोड्याची खोटी कहाणी मांडणारा अजय भदोरिया हा तरुण एका ई-कार्ड कंपनीत कॅश कलेक्टर म्हणून कामाला होता.

28 जून रोजी दुपारी डायल 112 वरून फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्याला मिळालेल्या माहितीत असं म्हटलं गेलं की, इकदिल पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी अजय भदोरिया याच्यासोबत ही घटना घडली. तो माहेरा रेल्वे क्रॉसिंग पुलावरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात तरुणांनी त्याची नोटांनी भरलेली बॅग हिसकावून घेतली.

पोलिस अधीक्षक संजय कुमार यांनी सांगितलं की, माहिती मिळताच फ्रेंड्स कॉलनी पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक घटनास्थळी गेले आणि फिर्यादीकडून चौकशी केली. यावेळी तो ई-कार्ड कंपनीकडून कॅश नेण्याचं काम करतो, असं सांगण्यात आलं. त्याने सांगितलं, की तो बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असताना अचानक ओव्हरब्रिजवर पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरून येत चोरट्यांनी त्याची बॅग हिसकावून नेली.

पोलिस अधीक्षक संजय कुमार यांनी सांगितलं की, पोलीस तपासात समोर आलं, की अजय भदोरिया हा ई-कार्ड कंपनीतून 496000 हजार रुपये बँकेत जमा कऱण्यासाठी घेऊन जात होता. मात्र, बँकेत जाण्याऐवजी त्याने संपूर्ण रक्कम त्याचा भाऊ अनुज भदोरिया याला दिली आणि पोलिसांना दरोड्याची कहाणी सांगितली. या आधारे अजय भदोरियाविरुद्ध फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्यात कलम 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.