Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खोदकाम करताना जमिनीतून आला खटखट आवाज; अचानक धरती फाटली अन्...

खोदकाम करताना जमिनीतून आला खटखट आवाज; अचानक धरती फाटली अन्...

बुलडाणा : जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून इथं उत्खनन सुरू होतं. जमिनीचं उत्खनन सुरू असताना जमिनीच्या आतून खटखट असा आवाज आला. यानंतर धरती फाटली आणि जमिनीतून असं काही बाहेर पडलं की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला आहे. सर्वांनी हात जोडले आहेत.

उत्खननादरम्यान 'शेषशायी विष्णू'ची विशाल मूर्ती सापडली. नागपूर विभागाचे पुरातत्वशास्त्रज्ञ अरुण मलिक यांनी पीटीआयला सांगितलं की, लखुजी जाधवरावांच्या छत्रीच्या संवर्धनाच्या कामात तज्ज्ञांच्या पथकाला काही दगड दिसले. आणखी उत्खनन केले असता सापडलेलं साहित्य पाहून उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले.

जमिनीत काय होतं?

मलिक म्हणाले, "सभा मंडप सापडल्यानंतर आम्ही आणखी उत्खनन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादरम्यान आम्हाला लक्ष्मीची मूर्ती सापडली. नंतर त्यात शेषशायी विष्णूची विशाल मूर्ती सापडली. ती 1.70 मीटर लांब आणि एक मीटर उंच आहे. पुतळ्याच्या पायाची रुंदी बहुधा 30 सेंटीमीटर असावी.

दशावतार, समुद्रमंथन आणि भगवान विष्णू यांचे चित्रण हे या मूर्तीचं वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी सांगितलं. भगवान विष्णू शेषनागावर विराजमान आहेत आणि देवी लक्ष्मी त्यांचे पाय दाबत आहे. या शिल्पात समुद्रमंथनाचे चित्रण आणि घोड्याचे कोरीव काम आणि त्यातून निघणारा ऐरावताही पटलावर पाहायला मिळतो.

अशी शिल्पं दक्षिण भारतात (होयसला राजवंश) बनवली गेली. शिल्पकला तज्ज्ञ सायली पालांडे दातार यांनी सांगितलं की, यामध्ये वापरलेला दगड हा शिस्ट रॉक आहे, जो स्थानिक ठिकाणी आढळणाऱ्या बेसाल्ट खडकापेक्षा मऊ आहे. अशा प्रकारची शिल्पे यापूर्वी मराठवाड्यात सापडली होती, पण ती बेसाल्ट खडकाची होती. शेषनाग आणि समुद्र मंथन यांच्यातील शिल्प देखील या पटलावर ठळकपणे कोरलेले आहे, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. भविष्यात, जेव्हा महाराष्ट्रात कला संग्रहालयाची स्थापना होईल, तेव्हा ही मूर्ती त्याच्या प्रमुख कलाकृतींपैकी एक असेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.