Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील (दादा ) यांचे निधन "सहकार रत्न" हरपले, सर्वसामान्यांचा आधारवड कोसळला

"सहकार रत्न" हरपले, सर्वसामान्यांचा आधारवड कोसळला; दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील (दादा ) यांचे निधन 


दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष, बेळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेते, सहकारी क्षेत्रावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे सामाजिक, राजकीय, धार्मिक व सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते, सहकार रत्न, रावसाहेब पाटील (दादा) (वय 81) यांचे मंगळवार रोजी निधन झाले.सर्वसामान्यांसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे , सामान्यांच्या तळागाळातील दादा म्हणून ख्याती असलेल्या रावसाहेब पाटील यांच्या निधनाने कार्यकर्त्यांच्या आधारवडच कोसळला आहे . त्यांच्या निधनाने महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये शोककळा पसरली आहे.गेल्या वीस दिवसापूर्वी दादांची तब्येत बिघडल्याने त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही दिवसापूर्वीच दादांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून ही सांगण्यात आले. मात्र उपचारांना प्रतिसाथ न देता त्यांची प्रकृती खालावली व मंगळवार रोजी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी मीनाक्षी, पुत्र अभिनंदन ,युवा नेते उत्तम पाटील, व मुलगी दिपाली, भाऊ,जावई, सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. मंगळवार दुपारी सुमारे चार वाजता येथील अरिहंत शाळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अनेक मान्यवर हजारो कार्यकर्ते यांनी अंत्यदर्शन झाल्यानंतर बोरगावच्या अरिहंत मराठी शाळा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र अभिनंदन व उत्तम पाटील यांनी भडाग्णी  दिले. 

बोरगाव हेच कार्यक्षेत्र असलेल्या रावसाहेब पाटील यांचा जन्म 11 एप्रिल 1944 रोजी अण्णासाहेब व सुमती या दांपत्यांच्या पोटी झाला. शेतकरी व खानदानी पाटील कुटुंबातून पुढे आलेल्या रावसाहेब पाटील यांच्यावर त्यांचे वडील व आई यांनी संस्कार केले .आपल्या घरातूनच त्यांनी सामाजिक कार्याचा वारसा घेतला. बोरगाव नगरीचा गेल्या 55 वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिल्यानंतर हा भाग मागासलेला आणि दुर्लक्षित होता. या भागाचे नंदनवन व्हावे आणि धार्मिक कार्याला सहकार आणि सामाजिक कार्याची जोड देण्यासाठी अनेक आव्हानांना समोर येतात रावसाहेब पाटील यांनी अथक प्रयत्न केले. अनेक संघर्षमय जीवनातून ते यशस्वी झाले. आयुष्यामध्ये स्वतःला प्रामाणिकपणे दादांनी वाहून घेतले. वयाच्या 81 वर्षे त्यांनी जीवनात अनेकांना जगण्याचा आधार दिला .शेतकऱ्यांच्या जीवनात संजीवनी आणण्याबरोबरच त्यांचे आर्थिक प्रगती झाली पाहिजे व शेतकरी ताठ मानेने स्वाभिमानीने उभा राहिला पाहिजे यासाठी बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूहाची स्थापना केली. या उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी अनेक निराधरांना विविध वेतन योजना, घरकुल योजना ,अपंगांना सायकल वाटप शैक्षणिक साहित्य माध्यमातून सामाजिक कार्य अखंडपणे सुरू ठेवले .आयुष्यभर काम करताना कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा न करता धर्मनिरपेक्ष भावनेने काम केले. राजकारण करत असताना सामान्य कार्यकर्त्याला राजकारणातून मोठा करण्याचे काम दादांनी केले होते. कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात फिरवत ताठ मानेने लढा देण्यास नेहमी सांगीतले.त्यांनी बोरगाव परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक संघ संस्थांची स्थापना केली. 

महाराष्ट्र व कर्नाटकात कार्यकर्त्यांचे मोहोळ

बोरगाव शहराबरोबरच निपाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते नेहमी आग्रही असतं. या त्यांच्या स्वभाववैशिष्ट्या मुळेच मतदारसंघातील गावागावातच नव्हे तर संपूर्ण जिल्हा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले.स्मरणशक्ती कुशाग्ररावसाहेब पाटील यांची स्मरणशक्ती अतिशय कुशाग्र होती .निपाणी तालुक्यातील राजकारणातील गेल्या 40 वर्षातील घटना त्यांना तोंडपाठ होत्या. सहकार्यातील अनेक निर्णय ते सहजपणे सांगत. राजकारणात कोण कधी काय म्हणाले याची अचूक माहिती त्यांच्याकडे असे.तरुणांचे नेते83 वर्षांचे रावसाहेब पाटील यांचा उत्साह दांडगा. आपल्या मुलांपेक्षाही कमी वयाच्या तरुणां बरोबर ते समरस होऊन बोलत. त्यामुळे त्यांच्याविषयी कमालीची आकर्षण होते .त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात तरुणांचा फौजा हजर राहत असतं .मतदारसंघातील तरुणांच्या वर विशेष लक्ष देऊन ते तरुणांचे नेते समजत होते.आपल्या 83 व्या वर्षातील तरुणांना लाजवेल असे कार्य त्यांचे होते.पाटील यांच्यामुळेच बोरगाच्या पाणी योजनेला गतीबोरगाव नागरिकांना  सतत भेडसवणारा प्रश्न म्हणजे पाणी समस्या. ही पाणी समस्येला कायमस्वरूपी निकाल काढण्यासाठी त्यांच्या माध्यमातून वर्ल्ड बँकेकडून या पाणी योजना मंजुरी मिळवली. व त्यांच्यामुळे संपूर्ण शहरवासीयांना पिण्यासाठी पाणी मिळत आहे. असे अनेक पाणी योजना त्यांनी शहरात राबविल्याने आज शेतकरी सह नागरिक समाधानी आहेत.

दक्षिण भारत जैन सभेला नवी संजीवनी
जैन समाजाच्या प्रतिष्ठेची समजली जाणारी दक्षिण भारत जैन सभेचे गेली चार टर्म (15 वर्षे) रावसाहेब पाटील अध्यक्ष आहेत . दक्षिण भारत जैन सभेमध्ये ते सन 2002 पासून सक्रीय होते. त्यांनी सन 2010 पासून अध्यक्ष पदाचा धुरा सांभाळल्यानंतरच या सभेला खऱ्या अर्थाने नवी संजीवनी मिळाले. संस्कार, शिक्षण, आरोग्य या त्रिसूत्रीवर त्यांनी भर देऊन समाजातील प्रत्येक मुलाला उच्च शिक्षण मिळावे यासाठी शिष्यवृत्ती योजना हाती घेतले .आज या शिष्यवृत्ती योजनेत कोट्यावधी रुपयांचे निधी उपलब्ध आहे.या माध्यमातून अनेकांना शिक्षण मिळाले तसेच संस्कार मिळाले आणि गोरगरिबांना आरोग्य सुविधा मिळत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.