Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मूंगूस सांगतो तुमची चांगली वेळ कधी येणार, धनलाभचे काय आहे कनेक्शन? जाणून घ्या

मूंगूस सांगतो तुमची चांगली वेळ कधी येणार, धनलाभचे काय आहे कनेक्शन? जाणून घ्या 


हिंदू धर्मात अनेक प्राण्यांबद्दल शुभ आणि अशुभ संकेत सांगितले आहेत.गाय, कावळा, साप, कासव अशा कितीतरी प्राण्यांवरून आपण शुभ- अशुभाचे तर्क वितर्क लावले जातात. प्रत्येक प्राण्याचा संबध हा भगवंताशी जोडलेला आहे.

माणूस जो शकून किंवा अपशकून निसर्गातल्या चिन्हांमध्ये शोधत फिरतो अन् सोयीनुसार ही चिन्ह स्वीकारतो. लहानपासून मुंगूसाला तोंड दाखवण्यासाठी रामाची गळ घातली जाते. आपल्या हिंदू धर्मात मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले जाते. मुंगूस पाहणे शुभ असते असे तुम्ही अनेकवेळा लोकांचे म्हणणे ऐकले असेल. आज आपण मुंगूसाचे दिसणे हे किती फलदायी असते याविषयी जाणून घेणार आहे.

मुंगूस सूर्याचे प्रतीक 
ज्योतिषशास्त्रात मुंगूस हे सूर्याचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रात अनेक शुभ चिन्हे त्याच्याशी संबंधित आहेत. मुंगूस तुमच्या जीवनात सूर्याप्रमाणे चमक आणतो. असे मानले जाते की, एखाद्या व्यक्तीला सकाळी लवकर मुंगूस दिसला तर त्याने समजावे की, लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे. 
परिसरात दिसणे शुभ की अशुभ?

सकाळी उठल्याबरोबर परिसरात मुंगूस दिसला तर लवकरच सात दिवसात तुम्हाला धनाशी संबंधित शुभवार्ता मिळणार आहे. कुठेतरी जाताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडला तर समजा तुमची सर्व कामे शुभ होणार आहेत. कोर्टात जाताना जर तुम्हाला मुंगूस दिसला तर तुमचे काम यशस्वी होणार आहे. एखाद्या कामासाठी जात असताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडला तर तुम्हाला त्या कामात यश मिळेल.

मुंगूस कुबेराचे वाहन 
धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस हे धनाची देवता कुबेर यांचे वाहन मानले जाते. मुंगूस हे भगवान कुबेराचं वाहन असतं. कुबेर हे धनरक्षक मानले जातात. म्हणूनच त्यांचं वाहन दिसणं शुभ मानलं जातं. त्यावरून असा संकेत मिळतो की, आता आपली आर्थिक भरभराट होणार आहे. शिवाय नशीब उजळण्याचंही हे लक्षण असतं. त्यामुळे मुंगूस दिसणं हे कुबेराचं दर्शन होण्यासमान असतं.

पूर्वी शत्रूपासून धन वाचवण्यासाठी निर्जनस्थळी पुरून ठेवले जात असे मुंगसाचा अधिवासही निर्जन जमिनीखालील खोल बिळांमध्ये असतो. त्यामुळे त्याला कुबेराचा खजिना ठाऊक असल्याची आख्यायिका जोडली गेलेली आहे. मुंगूस सोन्यात लोळण घेणारे असल्याच्या आख्यायिकेमुळे ते माणसाला धनलाभ करून देते या समजुतीने त्याला थेट रामाच्या नावाने तोंड दाखविण्याची गळ घातली गेली. 
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. सांगली दर्पण यातून कोणताही दावा करत नाही. )

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.