दोन अल्पवयीन मावसबहिणी घरात एकट्या होत्या. गावातील चार मुलांनी हेरलं.. कडी लावली, सामूहिक बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ देखील काढला..!
पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील या घटनेने पुन्हा एकदा नैतिकतेला काळीमा फासला असून अल्पवयीन मुलांच्या हार्मोन्स असंतुलनाचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटना आहे आंबेगाव तालुक्यातील. प्रचंड चीड आणणारी.. सराईत गुन्हेगारालाही लाजवणारी..!
आंबेगाव तालुक्यातील पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या गावात ही घटना घडली. गावातील दोन अल्पवयीन मावसबहिणी घरात एकट्या असताना गावातील दोन अल्पवयीन मुलांसह चार जणांनी ही बाब हेरली. चारही जण एकत्र आले. अचानक घरात प्रवेश करून त्यांनी घराला कडी लावली.
चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आणि त्यावेळी एकाने या घटनेचा व्हिडिओ काढला व पाचव्या मुलाला दिला. त्याने हा व्हिडिओ दाखवून एका अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेलिंग केले. या प्रकाराने गावातही चीड उत्पन्न झाली असून नागरिकही संताप व्यक्त करत आहेत.
दरम्यान अल्पवयीन मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेत याप्रकरणी पारगाव पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन अल्पवयीन मुलांसह अवधूत राजू पंचरास, कुणाल कैलास बोऱ्हाडे या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अत्याचाराचा व्हिडिओ या मुलांकडून घेऊन पुन्हा पिडीत मुलीला दाखवणाऱ्या महेश तांबे याच्याविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.