Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई एयर पोर्टवर प्रवाशाच्या गुदद्वारातून बाहेर काढलं लाखोचे सोनं तस्करी केल्याचं उघड

मुंबई एयर पोर्टवर प्रवाशाच्या गुदद्वारातून बाहेर काढलं लाखोचे सोनं तस्करी केल्याचं उघड 


कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाने 9.76 किलो सोनं जप्त केलं आहे.


या कारवाईमध्ये कस्टम विभागाने 9.76 किलो सोन्यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणं देखील जप्त केली आहेत. मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी सुरू असल्याचं उघडकीस आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत 6.75 कोटी रुपये आहे.
धक्कादायक बाब म्हणजे सोन्याची तस्करी शॅम्पू बॉटल, तसेच रबर शीटमधून सुरू होती. प्रवाशाने गुदद्वारातून सोन्याची तस्करी केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी चार प्रवाशांना मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.