Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संतोष कदम खून प्रकरण : गुंड सिद्धार्थ चिपरीकर याला अटकविशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सूचनेनंतर सांगली एलसीबीची कारवाई

संतोष कदम खून प्रकरण : गुंड सिद्धार्थ चिपरीकर याला अटकविशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सूचनेनंतर सांगली एलसीबीची कारवाई


सांगली :  सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याच्या खून प्रकरणातील संशयित गुंड सिद्धार्थ चिपरीकर याला तब्बल चार महिन्यानंतर अटक करण्यात आली. कदम याचा खून झाल्यानंतर मुख्य संशयित चिप्रीकर चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सूचनेनंतर सांगलीच्या एलसीबीच्या पथकाने त्याला कागल (जि. कोल्हापूर) येथे शिताफीने अटक केली. 

सिद्धार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर (रा. शिवभारत चौक, सांगलीवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. ७ फेब्रुवारी रोजी सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याचा मृतदेह कुरुंदवाड-नांदणी रस्त्यावर एका कारमध्ये सापडला होता. त्यानंतर कुरुंदवाडचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी तातडीने तपासाला गती देत यातील तीन संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडील चौकशीत रेकॉर्डवरील गुन्हेगार सिद्धार्थ चिपरीकर याचे नाव निष्पन्न झाले होते. 
या खून प्रकरणाचा तपास सुरू असतानाच मृत कदम याच्या कुटुंबियांना या प्रकरणाचा तपास दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे देण्याची मागणी केली होती. त्यानंतर या खुनाचा तपास इचलकरंजी येथील पोलिस उपअधीक्षकांकडे वर्ग करण्यात आला होता. संतोष कदम याचा खून झाल्यापासून चिपरीकर पसार झाला होता. कोल्हापूर पोलिसांना तो सापडत नसल्याने महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी सांगली एलसीबीला त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सांगली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक खास पथक तयार केले होते. 

पथक त्याचा शोध घेत असताना तो कर्नाटकात लपून बसल्याची माहिती मिळाली. तसेच तो कागल येथे येणार असल्याचीही माहिती मिळाली. त्यानंतर सांगली एलसीबीच्या पथकाने कागल पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला अटक केली. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनाने सांगली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, दीपक गायकवाड, बिरोबा नरळे, संदीप गुरव, अरूण पाटील, संदीप नलवडे, विनायक सुतार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.