त्यावेळी चेदी नावाचा एक देश होता, ज्याचा पुरू वंशाचा राजा उपरिचार वसू होता. उपरिचार हे इंद्राचे मित्र होते. ते विमानात आकाशात फिरत असत, म्हणून त्यांना उपरिचार असं नाव पडलं.
उपरिचारच्या राजधानीजवळ शुक्रमत नावाची नदी होती. एके दिवशी राजा शिकारीला गेले. तेव्हा त्यांना त्यांची सुंदर पत्नी गिरिकाची आठवण काढील. यामुळे तो कामुक झाला. त्याचं वीर्यस्खलन झालं. त्यानं ते वीर्य गरुड पक्ष्याला दिलं आणि आपल्या पत्नीपर्यंत पोहोचवायला सांगितलं.गरुड उडून गिरिकाकडे जात असताना त्याच्यावर आक्रमण झालं. परिणामी त्याच्याकडील वीर्य नदीत पडल. त्यावेळी नदीत एक अप्सरा राहत होती, तिचं नाव अद्रिका होतं. ब्रह्मदेवाच्या शापामुळे तिचं रूपांतर माशात झालं. सर्वाधिक वेळ ती नदीतच असायची. तिनं ते वीर्य ग्रहण केलं, त्यामुळे ती गरोदर राहिली.
माशाच्या पोटातून मुलगा आणि मुलगी
गिरिका माशाच्या रूपात मच्छिमाराच्या जाळ्यात अडकली. मच्छिमाराला माशाच्या पोटात एक मुलगा आणि मुलगी सापडली. तो त्यांना घेऊन उपरिचार राजाकडे गेला. तेव्हा माशाच्या रूपात असलेली अप्सरा शापातून मुक्त होऊन आकाशात गेली. राजा उपरिचाराने मुलीला कोळ्याकडे सोपवलं, ही मुलगी तुझी असं त्यानं सांगितलं. तर मुलाला आपला मुलगा म्हणून दत्तक घेतलं, जो नंतर मत्स्य नावाचा धार्मिक राजा बनला.
राजाने कोळ्याकडे सोपवलेली ती मुलगी जसजशी मोठी होत गेली तसतशी ती खूप सुंदर दिसू लागली. मच्छीमारांसोबत राहत असल्यानं तिचं नाव मत्स्यगंधा पडलं. तिच्या शरीरातून एक सुगंध उत्सर्जित होत होता. जो दुरूनही ओळखता येत होता, म्हणून तिचं आणखी एक नाव होतं, ते म्हणजे योजनागंधा.
हस्तिनापूरचा राजा शंतनू सुगंधाने मोहित
मत्सगंधाच्या सुगंधाने हस्तिनापूरचा राजा शंतनू मोहीत झाला. त्याने त्या सुगंधाचा पाठलाग केला. शेवटी त्याला एक सुंदर महिला दिसली. राजाने तिला तिच्याबाबत विचारलं. ती म्हणाली, मी धीवर जातीची कन्या आहे. वडिलांच्या आज्ञेनुसार मी नाव चालवते. राजा शंतनूला तिचा इतका मोह झाला की ते तिचे वडील दासराज यांच्याकडे तिचा हात मागायला गेले.तेव्हा दासराजाने एक अट घातली की जर तू माझ्या कन्येच्या पोटी जन्मलेल्या मुलाकडे राजगादी सोपवलीस तर मी तिचा विवाह तुझ्याशी करू शकतो. शंतनू आपला शब्द देऊ शकला नाही आणि तो तिथून आपल्या महालात परतला. मात्र त्यानंतर त्याला वाईट वाटू लागलं. त्याचा मुलगा देवव्रत म्हणजेच भीष्माला हे कळलं तेव्हा तो स्वत: त्या दासराजच्या घरी गेला. त्यानं वचन दिलं की तो आयुष्यभर लग्न करणार नाही, त्यामुळे मत्स्यगंधेच्या पुत्रांच्या मार्गात येणारा कोणताही मुलगा त्याला होणार नाही.
मत्स्यगंधेचा राजा शंतनूशी विवाह
मत्यगंधाचा विवाह राजा शंतनूशी झाला. त्यांना चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. चित्रांगद युद्धात मरण पावला. तर विचित्रवीर्य काही वर्षांनी आजारपणाने मरण पावला. विचित्रवीर्याला अंबिका आणि अंबालिका या दोन राण्या होत्या. दोघी बहिणी होत्या. दोन्ही बहिणींना महर्षी व्यासांपासून पांडू आणि धृतराष्ट्र हे पुत्र झाले. पांडूला पाच पुत्र होते, ज्यांना पांडव म्हणतात आणि धृतराष्ट्राला शंभर पुत्र होते, ज्यांना कौरव म्हणतात. कथा वाचल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल. नदीत वीर्य पडून जन्माला आलेली महाभारतातील ती महिला म्हणजे दुसरी तिसरी कुणी नाही तर कौरव आणि पांडवांची पणजी सत्यवती होती.
मत्स्यगंधा कशी झाली सत्यवती?
मत्स्यगंधेच्या शरीराला माशासारखा वास येत होता. मत्स्यगंधा लोकांना यमुनेच्या पलीकडे बोटीने नेत असे. एके दिवशी ऋषी पराशरही यमुना पार करण्यासाठी तिच्या बोटीत बसले. यावेळी त्यांनी तिला तिच्या जन्माबाबत माहिती असून तिच्यापासून पुत्र व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. तिनं होकार दिला तेव्हा काही काळानंतर पराशर ऋषींच्या पुत्राला जन्म दिला. मोठा झाल्यानंतर तो द्वैपायन नावाच्या बेटावर ध्यान करायला गेला. बेटावर केलेल्या तपश्चर्येमुळे आणि रंग काळे झाल्यामुळे तो कृष्णद्वैपायन या नावानं प्रसिद्ध झाला. हेच महर्षी व्यास. त्यांनीच वेदांचे संपादन केले आणि महाभारत हा ग्रंथ रचला. ऋषी पराशरांच्या आशीर्वादाने मत्स्यगंधाच्या शरीरातून माशाचा गंध नाहीसा झाला. यानंतर ती सत्यवती या नावाने प्रसिद्ध झाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.