Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धावत्या बसमध्ये महिलेला आली उलटी :, खिडकीतून डोके बाहेर काढताच शरिरापासून झाले वेगळे

धावत्या बसमध्ये महिलेला आली उलटी :, खिडकीतून डोके बाहेर काढताच शरिरापासून झाले वेगळे 


गाडीत बसले असतांना डोके, हात बाहेर काढू नका असे आपल्याला नेहमी सांगितले जाते. असे केल्यास अपघात होण्याची शक्यता असते. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करणे एका महिलेच्या जिवावर बेतले आहे.

गया येथे एका बस मधून प्रवास करत असताना एका महिलेला उलटीचा त्रास झाला. तिने उलटी करण्यासाठी गाडीतून डोके बाहेर काढले असता एका भरधाव गाडीने दिलेल्या धडकेमुळे तिचे शिर धडापासून वेगळे होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी पंचनपूर चौकाजवळ ही घटना घडली. सुमिंता देवी (वय ४८) असे मृत महिलेचे नाव असून ती अरवाल जिल्ह्यातील ओझा बिघा येथील रहिवासी रामरूप महतो यांची पत्नी आहे.
आजारी असल्याने वैद्यकीय उपचार घेण्यासाठी ही महिला गोहहून गया येथे जात होती. ती एका बसमधून प्रवास करत होती. बस पंचनपूर बाजारपेठेत पोहोचताच महिलेला उलट्या होऊ लागल्या. यामुळे तिने खिडकीतून डोकं बाहेर काढलं. याच वेळी गयाकडून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने महिलेच्या डोक्याला जोरदार धडक दिली. यामुळे तिचे शिर हे धडावेगळे झाले. महिलेचे रक्ताने माखलेले शरीर व डोकं नसल्यामुळे प्रवाशांचा थरकाप उडाला. प्रवासी किंचाळल्याने चालकाने बस थांबवली. बसमधील प्रवासी तातडीने खाली उतरले.

या घटनेची माहिती मिळताच डायल ११२ चे पथक व पंचनपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोठ्या प्रयत्नाने महिलेचा मृतदेह बसमधून बाहेर काढला. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. सुमिंता तिची लहान बहीण आणि बहिणीच्या मुलासह उपचारासाठी गया येथे डॉक्टरकडे जात होती. दरम्यान, ती एका भीषण अपघाताची बळी ठरली.
शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मगध मेडिकल पोलीस स्टेशन हद्दीतील गुलबिया चकाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गुलबिया चक येथील राका असे १७ वर्षीय तरुणाचे नाव आहे. मगध मेडिकल स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.