नैतिक संबंधातून भाच्याने केला मामीचा खून
मुंबई: नालासोपाऱ्यात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या महिलेच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले होते. अनैतिक संबंधातून या महिलेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. अनैतिक संबंधातून भाच्याने मामीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
दरम्यान, मतदार यादी आणि घटनास्थळावरुन भेटलेल्या स्प्रेवरुन या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला दिल्लीहून अटक केली आहे. आरोपी नजाबुद्दीन आणि मयत सायराबानू यांचे मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र, नजाबुद्दीनने लग्न केल्याने सायराबानू संतप्त झाली. नजाबुद्दीनच्या लग्नामुळे त्याचे सायराबानूसोबत खटके उडू लागले. त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे नजाबुद्दीनने तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.