Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' जगलं भीं हमारा... राज भीं हमारा ' विश्व्जीत कदम यांनी फोडली डरकाळी!

' जगलं भीं हमारा... राज भीं हमारा ' विश्व्जीत कदम यांनी फोडली डरकाळी!


सांगली लोकसभा निवडणूक राजकीय पक्षांसाठी चांगलीच प्रतिष्ठेची ठरली. महाविकास आघाडीने वसंतदादा घराणे व काँग्रेसला डावलल्याने ही निवडणूक विशाल पाटील यांच्या अस्तित्वाची राहिली. बंडाचा झेंडा हाती घेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. वारं फिरलयंचा नारा देत सहानुभुतीच्या लाटेवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी दिल्ली गाठली असली तरी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी करून दाखवल्याचे स्पष्ट झाले.

काँग्रेसची हक्काची जागा बळकावणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नाकावर टिचून विशाल यांना मदत केली, सांगलीचे वाघ आम्हीच आहोत, हे ही दाखवून दिले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात यांना महायुतीबरोबर असल्याचे भासवत विशाल यांच्या विजयात विश्वजीत कदम किंगमेकर असल्याचे स्पष्ट झाले.
महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना (उबाठा) या घटक पक्षाने कोल्हापुरची शिवसेनेची जागा काँग्रेसला दिली आणि त्या बदल्यात सांगलीची जागा घेतली. सांगली लोकसभेची उमेदवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर करून टाकली. यामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांना विश्वासात देखील घेतले नाही. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली.

विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. त्यानुसार विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सन 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना घटक पक्ष म्हणून सहभागी होते. त्यांनी सांगलीची जागा घेतली, ऐनवेळी विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून प्रचंड रामायण घडलेे.

काँग्रेसचे जिल्हा नेते आमदार विश्वजीत कदम यांनी सांगलीची जागा विशाल पाटील यांना मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण यश आले नाही. यंदाच्या निवडणुकीत हाच प्रयोग झाला आणि शिवसेना (उबाठा) गटाला जागा गेली. त्यामुळे ही निवडणूक आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे. यावेळी तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा पराभव झाला तर काँग्रेस या मतदारसंघातून हद्दपार होईल.

शिवाय दादा घराण्याला देखील मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस प्रेमी व दादा घराण्याच्या अस्तित्वाची राहिली. दहा वर्षे काँग्रेस लोकसभेच्या आखाड्यातून बाहेर गेली तर भविष्यात पक्ष वाढविणे अडचणीचे ठरण्याची भीती होती. त्यामुळे माजी मंत्री व आमदार विश्वजीत कदम यांच्यासह जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांचीही विशाल यांनाच मदत झाली.

महाविकास आघाडीत काँग्रेसची ताकद असतानाही उमेदवारी नाकारण्यात आली. जिल्ह्यात सेनेची ताकद नसताना तिकीट घेवून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने विश्वजीत कदम आक्रमक झाले. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राहिली, मात्र काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रमच झाला होता. त्याची पुनरावृत्ती लोकसभेच्या निवडणुकीत झाली.

महाविकास आघाडीत शिवसेनेला नाराज न करता काही सभांमध्ये विश्वजीत कदम सहभागी झाले, मात्र मनापासून ते सोबत नव्हते. काँग्रेसची हक्काची जागा बळकावणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हिसका दाखवण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचे अंतर्गत मदत विशाल पाटील यांना झाली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत विश्वजीत कदम यांनी शिवसेनेचे वाघ तुम्ही आहात मात्र सांगलीचे वाघ आम्हीच आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला होता.

ज्या पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी सांगली लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली त्याप्रमाणे काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनीही सांगलीचे वाघ आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांना सोबत घेऊन विशाल पाटील यांना मदत करण्यात यश आले. दुसरीकडे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावलेल्या भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

भाजप पक्षाने दुसर्‍या यादीतच खा. पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. भाजपमध्येही सर्वकाही ठिकठाक नव्हते. भाजप नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष दिसून आला. माजी आमदार विलासराव जगताप यांनी खासदारांवर आरोप करीत त्यांच्याविरोधात प्रचार केला. गतवेळी सोबत असलेले माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही साथ सोडली. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी विरोधात काम केल्याची ऑडिओ क्लिप गाजली होती, त्याचा फायदा उठवण्यात विश्वजीत यशस्वी झाले.
काँग्रेसची हक्काची जागा बळकावणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नाकावर टिचून विशाल यांना मदत केली, स्वतःच्या पलूस-कडेगाव मतदारसंघात मताधिक्य दिलेच, मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात यांना महायुतीबरोबर असल्याचे भासवत विशाल यांच्या विजयात विश्वजीत कदम किंगमेकर दाखवून दिल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.