मुंबई : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. खासदार होताच तिला एका धक्कादायक प्रकाराला सामोरं जावं लागलं. ०6 रोजी चंदिगढ विमानतळावर कंगनासोबत धक्कादायक प्रकार घडला.
एका CISF महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने कंगनाच्या कानफाडीत मारली. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरु असून बॉलिवूडचे अनेक कलाकारही त्यावर प्रतिक्रिया देत आहे. काही जणांनी कंगनाला पाठींबा दिला आहे तर काही जणांनी त्या महिला जवानाच्या कृतीचं समर्थन केलं आहे. अशातच आता जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची या प्रकरणावरील प्रतिक्रिया समोर आली आहे.
कंगनासोबत घडलेल्या या प्रकारावर बॉलिवूडमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेवर नुकतेच अभिनेते नाना पाटेकर यांनीही आपले वक्तव्य केलं आहे. नाना पाटेकर 7 जून रोजी दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. या मुलाखतीत नानांनी सध्याचे सरकार, शेतकऱ्यांची स्थिती आणि कंगनाच्या थप्पड प्रकरणावर भाष्य केलं.
यावेळी नानांना 'सरकार बदललं आहे, आता शेतकऱ्यांची स्थिती सुधारेल असं वाटतं का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नाना म्हणाले, 'आमच्या बाजूने प्रत्येक वेळी मुद्दा मांडला जाईल आणि आत्तापर्यंत आधीच्या सरकारने खूप चांगलं काम केलं आहे. यावेळीही ते करतील अशी खात्री आहे.'कंगना रणौतसोबत झालं त्याविषयी देखील नानांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, 'मला कंगना रणौतसोबत नक्की काय घडलं ते फार माहिती नाही. पण जे झालं ते अत्यंत चुकीचं आहे. हे असं कधी कोणासोबत घडू नये. मला आशा आहे की ती चांगलं काम करेल. आता सगळं चांगलं होईल कारण विरोधी पक्षही चांगला आहे. आणि सर्वजण मिळून एकत्र चांगलं काम करतील.' अशी प्रतिक्रिया नानांनी दिली आहे.कंगना चंदीगडवरुन दिल्लीकडे रवाना होत असताना विमानतळावर राडा झाला. विमानतळावर एका CISF च्या महिला रक्षकानंच कंगनाच्या कानशिलात लगावली. याशिवाय तिनं कंगनाला शिवीगाळही केली. कंगनाच्या कानशिलात मारल्यानंतर आणि तिला शिवीगाळ केल्यानंतर CISF महिला जवानानं सांगितलं की, जेव्हा कंगनानं शेतकरी आंदोलन करणाऱ्यांवर टीका केली होती आणि त्यांना म्हटलं होतं की, 100 रुपये घेऊन या शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. तेव्हा माझी आई त्या आंदोलनात होती. माझ्या आईला 100 100 रुपये घेऊन धरणा आंदोलनाला गेलं असल्याचं म्हटलं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.