पुणे :- लग्नानंतर गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणं अशी कित्येक प्रकरण आहेत. बऱ्याच जणांचे विवाहबाह्य संबंध आहेत. मुलं असताना पत्नी किंवा पती दुसऱ्या कुणासोबत तरी पळून गेल्याची प्रकरणंही कमी नाहीत. पण सध्या असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. एका व्यक्तीची बायको तिच्या प्रियकरासोबत पळून गेली म्हणून त्यानेही आपल्या मित्राची बायको पळवली.
जळगावमधील ही व्यक्ती. त्याची पत्नी प्रियकरासोबत पळून गेली. बायको सोडून गेल्यानंतर विरह त्याला सहन झाला नाही. काही दिवस गावात राहून तो कामधंद्याच्या शोधात पुण्यात पोहोचला. पुण्यात त्याचा एक मित्र राहत होता. या मित्राच्या मदतीनंच त्याला काम मिळालं. याच मित्राच्या घरी त्याचं येणं-जाणंही वाढलं. याचवेळी मित्राच्या पत्नीशी त्याचं प्रेम जुळलं. दोघांनीही संधी साधून पुण्यातून पळ काढला.
पती-मुलांकडे परत यायला तयार नाही पत्नी
पतीच्या मित्रासोबत पळालेल्या या महिलेला दोन मुलं आहेत. तिच्या पतीनं दोन मुलांना सोबत घेऊन तिला शोधून काढलं. तिला आपल्यासोबत यायची विनंती केली. मुलंही आईला बिलगून रडत होती. सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं पण प्रेमात आकंठ बुडालेल्या आईला मात्र पाझर फुटला नाही. तिनं आपल्याला प्रियकरासोबतच राहायचं असल्याचं सांगितलं. यामुळे पोलीसही चक्रावले.
प्रियकरासोबत बायको पळाली; पठ्ठ्याने लगेच दुसरी आणली
बिहारमध्ये घडलेली ही घटना. एक विवाहित आणि दोन मुलांची आई ऑनलाइन ल्युडो पार्टनरच्या प्रेमात पडली आणि पतीला सोडून प्रियकराकडे निघून गेली. दुसरीकडे पतीनेदेखील पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह केला. यानंतर पहिली पत्नी प्रियकराकडून परत आली आणि तिनं पतीकडे पोटगी मागितली. पती-पत्नीचं हे विचित्र प्रकरण उघडकीस येताच गावात जोरदार चर्चा सुरू झाली.
या प्रकरणी पहिली पत्नी पूजा कुमारीने सांगितलं, माझा विवाह 2017-18मध्ये बलहा इथल्या गौतम कुमारशी झाला. त्याची आई, बहीण आणि भावजय मला पाहू इच्छित नव्हत्या. त्या मला खूप त्रास देत होत्या. ऑनलाइन ल्युडो खेळत असताना मी माझ्या प्रियकराकडे पळून गेले ही माझी चूक आहे. तो यूपीचा असून त्याचं नाव विनोद आहे. माझ्यासोबत घटस्फोट न घेता गौतम कुमारने दुसरा विवाह केला आहे. माझ्या पतीने लपून दुसरा विवाह केला त्यावर माझा आक्षेप नाही. तो मला त्याच्यासोबत राहू देणार असेल तर माझी हरकत नाही; पण जर तो मला त्याच्यासोबत राहू देणार नसेल तर त्याने माझ्यासह मुलांचा खर्च उचलावा, ही माझी मागणी आहे. कारण मला अनेक आजार आहेत, त्यामुळे त्याने दिलेल्या पैशांतून मी माझं पालनपोषण करू शकेन.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.