सांगली :- कन्नड शाळेमध्ये चक्क मराठी शिक्षकांची नियुक्ती, जिल्हा परिषदेचा अजब कारभार :, आ. विक्रम सावंत
सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार समोर आला असून कन्नड शाळेमध्ये मराठी माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जत तालुक्याचे काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत तालुक्यातील 10 कन्नड शाळांमध्ये शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. या कन्नड शाळांवर मराठी शिक्षकांची नियुक्ती झाल्याचा आरोप करत काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सांगली जिल्हा परिषदेचा पवित्र पोर्टल मध्ये भोंगळ कारभार झाल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. कन्नड शाळेतील कन्नड विद्यार्थ्यांना मराठी शिक्षक कसे शिकवणार ? असा सवाल आमदार सावंत यांनी उपस्थित केला असून कन्नड शाळेतल्या मराठी माध्यम शिक्षकांच्या नियुक्ती रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, जत तालुक्यातल्या कर्नाटक सीमेवर राज्य सरकारच्या 132 कन्नड शाळा आहेत. अशातच आता काही शाळांमध्ये मराठी शिक्षकांची नियुक्ती झाल्याने ते कन्नड विद्यार्थ्यांना कसे शिकवणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे कन्नड विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.